Margao Municipal Council Dainik
गोवा

Margao Municipality : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Councilor Mahesh Amonkar: बेकायदेशीररीत्‍या व्‍यवसाय करणाऱ्यांविरुद्धही पालिकेने कारवाई मोहीम हाती घ्‍यावी, अशी मागणी प्रभाग १५चे नगरसेवक महेश आमोणकर यांनी मुख्‍याधिकारी मेल्विन वाझ यांच्‍याकडे केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao: मडगाव नगरपालिकेकडून उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांविरुद्ध सध्‍या सुरू केलेल्‍या कारवाईच्‍या धर्तीवरच विनापरवाना, बेकायदेशीररीत्‍या व्‍यवसाय करणाऱ्यांविरुद्धही पालिकेने कारवाई मोहीम हाती घ्‍यावी, अशी मागणी प्रभाग १५चे नगरसेवक महेश आमोणकर यांनी मुख्‍याधिकारी मेल्विन वाझ यांच्‍याकडे केली आहे.

नगरसेवक आमोणकर यांनी गुरुवारी सकाळी मुख्‍याधिकारी वाझ यांची भेट घेऊन सध्‍या पालिका क्षेत्रातील ब्‍लॅक स्‍पॉट्‌सवर आणि अन्‍यत्र उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांविरुद्ध पालिकेकडून रात्रीच्‍यावेळी मोहीम राबवून दंड ठोठावला जात आहे, ते स्‍वागतार्ह असल्‍याचे सांगितले.

पालिकेचा महसूल होतो कमी!

आपल्‍या प्रभाग १५ मध्‍ये असे विनापरवानगा व्‍यवसाय फोफावत चालले आहेत. खासकरून रात्रीच्‍यावेळी अशी दुकाने खाेलण्‍यात येतात. तयार कपडे व अन्‍य प्रकारची ही दुकाने असून ग्राहकांची तेथे खरेदीसाठी गर्दी पडत असते. विनापरवाना व्‍यवसाय केला जात असल्‍याने पालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे, असे आमोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT