Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! गोव्यात एकाच टप्प्यात होणार परीक्षा

Goa 10th exam: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.

Sameer Amunekar

पणजी : केंद्रीय शिक्षण मंडळाने यंदापासून दहावीची परीक्षा दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी गोव्यात मात्र ही परीक्षा यंदाही पारंपरिक पद्धतीने एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. मात्र, गोवा सरकार याबाबत अजून अभ्यासक्रमात असून तातडीने अंमलबजावणी होणार नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमार्फत या निर्णयाचा सर्वांगीण अभ्यास करण्यात येणार असून, त्यानंतर गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला योग्य ती शिफारस करण्यात येईल, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत शैक्षणिक मूल्यांकनात मूलगामी बदल सुचवले गेले असून, परीक्षा पद्धती सुलभ आणि बहुआयामी बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.

गोवा सरकारही त्याच दिशेने पावले टाकत असून, राज्याच्या शैक्षणिक वास्तवाशी सुसंगत निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मिळते.

दहावीच्या दोन टप्प्यांतील परीक्षा यंत्रणेबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांना समजून घेण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे ही संकल्पना लागू करायची झाल्यास ती २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासूनच शक्य होईल. - प्रसाद लोलयेकर, शिक्षण सचिव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT