Cottages at Pilgrim Village Old Goa Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier Exposition: यात्रेकरूंच्या स्वागतासाठी गोवा होतोय सज्ज; भाविकांच्या व्यवस्थेसाठी कॉटेजीसची केली जायेत निर्मिती

Cottages at Pilgrim Village Old Goa: भाविकांची राहण्याची सोय करणाऱ्या एकूण १७ कॉटेजीस बांधण्याचा विचार सुरु असून यांपैकी १० कॉटेजीस बांधून तयार आहेत.

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाला देश-विदेशातून अनेक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जातेय आणि ४६ दिवसांसाठी चालणाऱ्या या सोहळयाला येणाऱ्या कुठल्याही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ओल्ड गोव्याच्या चर्च पासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर कॉटेज बांधण्याची व्यवस्था करण्यात आलीये.

जवळपास २०० भाविकांची राहण्याची सोय करणाऱ्या एकूण १७ कॉटेजेस बांधण्याचा विचार सुरु असून यांपैकी १० कॉटेजेस बांधून तयार आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे कॉटेजेस बांधले जात आहेत.

कॉटेजमधल्या प्रत्येक खोलीत यात्रेकरूंसाठी लाईट, फॅन आणि चार्जिंग पॉईंट्सची व्यवस्था करण्यात आलीये आणि एका कॉटेजमध्ये साधारण १० ते १२ माणसं वावरू शकतील एवढी व्यवस्था केली गेलीये.

कॉटेजच्या फ्रेम्स बांबू आणि नारळाच्या पानांनी सुबकपणे झाकल्या गेल्या आहेत, यामुळे कॉटेजला इको-फ्रेण्डली रूप येईल. कॉटेजमध्ये राहणाऱ्या भाविकांसाठी कॉटेजच्या बाहेर कॉमन टॉयलेट ब्लॉक्सही बांधण्यात आले आहेत.

जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शांचे हे १८वे वर्ष आहे. ५ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात गोव्याच्या सायबाच्या फेस्ताचा देखील समावेश होतो, म्हणूनच यंदाच्या वर्षी या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमण्याची शक्यता असल्याने येणाऱ्या प्रत्येकाचे योग्य आदरतिथ्य व्हावे म्हणून समितीचे आणि राज्यचे प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT