Jetty  Canva
गोवा

Cortalim Jetty: कुठ्ठाळी जेटीचे खासगीकरण होऊ देणार नाही; आमदार वाझ

Cortalim Jetty Privatization Issue: कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा आणि पारंपरिक मच्छीमारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी कुठ्ठाळी फेरी पॉइंट येथील मासेमारी जेट्टी खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे.

वाझ यांच्यासह कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा आणि पारंपरिक मच्छीमारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. आमदार आंतोनियो वाझ पुढे म्हणाले की, आम्हाला विधानसभेच्या प्रश्नाद्वारे (एलएक्यू) मासेमारी जेट्टी खाजगी कंपनीला दिली जाऊ शकते हे कळले. त्यामुळे आम्ही कुठ्ठाळी पंचायत सदस्य आणि मच्छीमारांसह याला विरोध करण्यासाठी येथे आलो आहोत.

या मतदारसंघातील नागरिकांचा जेट्टीच्या खासगीकरणास विरोध आहे. गेल्यावेळी आम्ही बंदरांचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. आम्हाला सांगण्यात आले की जेटीच्या खासगीकरणाचे प्रकरण तूर्त जैसे थे आहे.

यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी आधीच बोललो आहे आणि त्यांनी मला जेटीचे खासगीकरण होणार नाही असे आश्वासन दिले आहे. मी हा प्रकल्प इथे येऊ देणार नाही आणि शून्य तासाच्या चर्चेत या प्रकरणाचा उल्लेख करेन, असेही वाझ यांनी सांगितले.

कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा म्हणाल्या की, परिसरातील लोक जेटीचे खासगीकरण करण्याच्या विरोधात होते आणि त्यांना या भागात कॅसिनो जहाजे येण्याची भीती होती. जेटी आधीच भाडेतत्त्वावर आहे १४ डिसेंबर २०२२ रोजी पंचायतीने नदी परिवहन खात्याला पत्र लिहून कुठ्ठाळी येथे फेरी जेटी भाड्याने देण्यास आमचा आक्षेप असल्याचे कळविले आहे.

‘ग्रामसभा बोलावणार’

आम्ही आमच्या आमदारांसह बंदर कप्तान यांच्या कार्यालयात गेलो असता जेटीच्या खासगीकरणाची निविदा स्थगित ठेवण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मग, आता ही जेटी भाडेतत्त्वावर देण्याचा घाट का? असा प्रश्न सरपंच सेनिया परेरा यांनी उपस्थित केला. परेरा यांनी जानेवारीत झालेल्या ग्रामसभेच्या ठरावाचाही उल्लेख केला, ज्यात गावकऱ्यांनी जेटीच्या भाडेतत्त्वाला जोरदार आक्षेप घेतला होता. मी सरकारला विनंती करते की स्थानिक नागरिक, पंचायत आणि आमदार यांना बगल देऊ नका. कारण आम्ही सामान्य जनतेला उत्तरदायी आहोत. जेटीच्या खासगीकरणातून होणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव घेण्यासाठी मी आणखी एक ग्रामसभा बोलावणार आहे, असेही परेरा म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Horoscope: करिअर, प्रेमात मिळणार यश! 'या' मूलांकांच्या व्यक्तींना 'सप्टेंबर' ठरणार भाग्यशाली

Goa Rain: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

Goa Live Updates: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT