भ्रष्ट भाजप सरकार विरुद्धच्या लढाईत आप गोव्यातील जनतेसोबत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढत आहोत, गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकार गेले पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम राहू अस मत आप नेते अमित पालेकर यांनी व्यक्त केले आहे. उद्या गुरुवारी म्हणजेच 10 मार्चला देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यात गोव्याचा देखील समावेश आहे. 14 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात गोव्यातील मतदान पार पडले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली. तसेच राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राजकीय (Politics) नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत होते.
दरम्यान, गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे तसेच भाजपशी काँग्रेसची लढत होण्याचा अंदाज आल्याने, 2017 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आप आणि काँग्रेस या दोघांनीही आपापल्या उमेदवारांचे विलगीकरण केले आहे. काँग्रेसने (Congress) आपल्या उमेदवारांना उत्तर गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये हलवले आहे, जिथे ते गुरुवारी मतमोजणी संपेपर्यंत आणि निकाल लागेपर्यंत राहतील. एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला तीन जागा मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तृणमूल काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकते. अशी शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, 2017 मध्ये गोव्यात काँग्रेसची मोठी राजकीय हानी झाली होती. भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले होते. आणि पाहता पाहता 2022 पर्यंत काँग्रेसच्या 17 आमदारांवरून (MLA) संख्या दोनवर आली होती.
निवडणूक झालेल्या किमान दोन राज्यांमध्ये त्रिशंकू विधानसभांचा (Assembly) अंदाज एक्झिट पोलने वर्तवला असल्याने, काँग्रेस आणि भाजप सर्व जागा कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेससाठी, गोवा आणि मणिपूरमधील (Manipur) 2017 च्या उलथापालथाच्या आठवणी ताज्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.