Corporator Ameya Chopdekar  dainik gomantak
गोवा

Murgaon Municipality : उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अमेय चोपडेकर निश्चित

मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अमेय चोपडेकर बिनविरोध निवड होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

वास्को : मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मंगळवार (दि.29) निवडणूक होणार आहे. आज सोमवारी 28 रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करण्याच्या दिवशी एकमेव अर्ज मुख्याधिकारी जयंत तारी यांच्याकडे आला. हा अर्ज प्रभाग 18 चे नगरसेवक अमेय अनिल चोपडेकर यांनी सादर केला. यामुळे अमेय चोपडेकरांची मंगळवारी उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. (Corporator Ameya Chopdekar likely to be elected unopposed for the post of Deputy Mayor of Murgaon Municipality)

दरम्यान श्रद्धा महाले यांनी 15 मार्च रोजी मुरगावच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेली जागा भरून काढण्यासाठी पालिका संचालक कार्यालयाने 29 रोजी मुरगावचा (Murgaon) नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बैठक बोलावली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी 28 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याचे पालिका संचालक कार्यालयातर्फे कळवण्यात आले. उपनगराध्यक्ष कोण? हे 29 रोजी बैठक झाल्यानंतरच स्पष्ट होणार असले, तरी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे समर्थन असलेला नगरसेवक अमेय चोपडेकर पुढचा उपनगराध्यक्ष बनणार असल्याची चर्चा रंगू लागली होती.

विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) वास्को मतदारसंघातून पराभूत झालेले कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेल्या उपनगराध्यक्षा श्रद्धा महाले यांच्याविरुद्ध 25 पैकी 16 नगरसेवकांनी (corporators) अविश्वास ठरावाची नोटीस पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केली होती. 14 मार्च रोजी 16 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस जारी केल्यानंतर अविश्वासाचा निर्णय जाणून घेण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या बैठकीला न थांबता श्रद्धा महाले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

यामुळे रिक्त झालेल्या मुरगाव नगरपालिकेच्या (Murgaon Municipality) उपनगराध्यक्ष पालिका संचालक कार्यालयाने पदाच्या खुर्चीवर नवीन मुरगावचा उपनगराध्यक्ष बसवण्यासाठी २९ मार्च (मंगळवार) रोजी बैठक बोलावलेली आहे. सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात ही बैठक होणार असून, मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गवस देसाई बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकाने 28 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याचे पालिका संचालक कार्यालयाकडून कळवण्यात आले होते. मुरगावचा पुढचा उपनगराध्यक्ष कोण बनणार, यावर सगळ्यांचे लक्ष होते.हा तिढा सुटला असून अमेय चोपडेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तेव्हा उद्या औपचारिकता बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT