corona possitive 
गोवा

कोरोनाचे आणखी तीन बळी

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. बुधवारी दिवसभरात आणखी तिघांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या ३९वर पोहोचली आहे. दरम्यान, २०२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले, तर १८९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्‍या १६६६ एवढी झाली आहे.

बुधवारी सडा - वास्को येथील ७१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे बळी गेला. त्‍यांना प्रथम मडगाव येथील कोविड इस्‍पितळात दाखल केले होते. त्‍यानंतर उपचारासाठी एमपीटी रुग्णालय वास्को येथे त्‍यांना हलविण्यात आले होते. तेथे त्‍यांचे उपचारादरम्‍याने निधन झाले.

दुसरा रुग्ण उसकई येथील ५६ वर्षीय असून त्‍यांना उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात मृतावस्थेत आणले होते. तसेच मडगावात ४३ वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला. त्‍यांना खासगी इस्पितळात दाखल केले होते.

तेथे ही महिला कोविड पॉझिटिव्‍ह असल्याचे समजताच त्‍यांना कोविड इस्‍पितळात दाखल केले होते. या महिलेची स्थिती गंभीर होती. तेथेच त्‍या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

राज्‍यभरातील कोरोनाबाधित
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी ८६ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आणि ५६ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३५ जणांना ठेवण्यात आले. १६३४ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २३८७ जणांचे अहवाल हाती आहेत.

दरम्यान, रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ८९ रुग्ण आहेत. डिचोलीत ६ रुग्ण, साखळीत ६६, पेडणेत ५, वाळपईत ६, म्हापशात ४०, पणजीत ६१, बेतकी येथे ७, कांदोळीत ३९, कोलवाळ येथे ४७, खोर्ली येथे १२, चिंबल येथे ६४, पर्वरीत १८, कुडचडेत ११, काणकोणात ५, मडगावात १०८, वास्कोत ४०३, लोटलीत ३९, मेरशी येथे ९, केपेत १०, सांगेत ५, शिरोड्यात १४, धारबांदोड्यात ४३, फोंड्यात ७२ आणि नावेली येथे २५ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

- महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

SCROLL FOR NEXT