dead-body 
गोवा

कोरोनाचे आणखी तीन बळी

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी : राज्यात कोरोना बळी व संसर्गाची परिस्‍थिती दिवसेंदिवस बिकटच होत आहे. बुधवारी आणखी तीन कोरोनाबाधितांचा बळी गेला. त्‍यात फातोर्डा येथील ५० वर्षीय एका हॉटेलचालक व्यक्तीचा (२२ जुलै), बोगदा - वास्को येथील ५२ वर्षीय महिलेचा गोमेकॉत काल (२१ जुलै) मृत्यू झाला. तसेच मांगोरहिल परिसरातील ७१ वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्‍यू झाला. त्‍यामुळे राज्यातील ‘कोविड’मुळे मृतांची एकूण संख्या २९ झाली आहे.

आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार राज्यात कोरोनाबाधित रुग्‍णांची एकूण संख्‍या १६०७ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३०१३ जणांच्या ‘कोविड’ पडताळणी चाचण्या केल्‍या असून, त्‍यात १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. आजच्या दिवशी ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. सामूहिक संसर्गाला आळा घालायचा असेल तर सार्वजनिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांनीही अधिक काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे. आजच्या दिवशी १८ देशी प्रवाशांना आणि ५८ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३० जणांना ठेवण्यात आले. अद्याप ४८६६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

म्‍हापशात आणखी चार पॉझिटिव्‍ह
म्‍हापसा शहरात बुधवारी आणखी ४ कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सापडले आहेत. आतापर्यंत ७२ पॉझिटिव्‍ह सापडले आहेत. काल बळी गेलेल्‍या व्‍यक्तीच्‍या संपर्कात आलेल्‍या एकतानगर येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. घाटेश्‍वरनगरमध्‍ये २ पॉझिटिव्‍ह सापडले. हे दोघेही कर्नाटकात विवाहासाठी गेले होते. १८ रोजी गोव्‍यात आल्‍यानंतर त्‍यांची चाचणी केल्‍यानंतर त्‍यांचाही अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. म्‍हापसा येथील खासगी इस्‍पितळात काम करणारी महिला कर्मचारी पॉझिटिव्‍ह, तर होलसेल दरात मद्यविक्री करणारा कंपनी कर्मचारी पॉझिटिव्‍ह सापडल्‍याने खळबळ माजली आहे.

अखेर अंत्यसंस्कारांचा प्रश्न सुटला
राज्यात कोरोनामुळे मृत्यू होत आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याबाबत चर्चा केल्या जात होत्या. तसेच शववाहिकांचाही प्रश्न निर्माण झाला होता. आता या अंत्यसंस्कारांची पूर्ण जबाबदारी दक्षिण गोव्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्ना आचार्य यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली. कोविड रुग्णाचा मृत्यू झाला की, त्या रुग्णाच्या नातेवाईकाला कळविण्यापासून ते त्या रुग्णाला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी शववाहिकेची जबाबदारी पार पडण्यापर्यंत सर्व व्यवस्था केली जाणार आहे. येथे गरज पडल्यास खासगी शववाहिका आणि स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गस्थळे
कुठ्ठाळी ३७७
वास्को ३७४
साखळी ९२
चिंबल ७२
म्हापसा ६१
मडगाव ६७
फोंडा ५७
रस्ता, विमान, रेल्वेतून आलेले प्रवासी १२९

पणजीवासीय भीतीच्या छायेत 
गोव्याची राजधानी पणजी आणि आसपासच्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने लोकांत घबराट पसरली आहे. पणजी येथील मासळी बाजारपेठेत तिघेजण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाली. तसेच सांतिनेज, बांध येथे दोघेजण पॉझिटिव्ह आढळले.

मासळी बाजारपेठेचा परिसर अतिशय दाटीवाटीचा असून शिवाय सापडलेले तीन पॉझिटिव्ह रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे तिघे ज्या इमारतीत राहतात तेथील लोकांची कोविड पडताळणी चाचणी करण्यात येत आहे.

तसेच टोंक, करंजाळे, धेंपे भाट येथे कंटेन्‍मेंट झोन लागू केला आहे. येथील एक महिला पॉझिटिव्ह सापडल्‍याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १२९ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात ४ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ९२, पेडणे आरोग्य केंद्रात २६, वाळपई आरोग्य केंद्रात ६, म्हापसा आरोग्य केंद्रात ६१, पणजी आरोग्य केंद्रात ३८, बेतकी आरोग्य केंद्रात १४, कांदोळी आरोग्य केंद्रात ११, कोलवाळ आरोग्य केंद्रात ३७, खोर्ली आरोग्य केंद्रात २५, चिंबल आरोग्य केंद्रात ७२, पर्वरी आरोग्य केंद्रात २३, कुडचडे आरोग्य केंद्रात १५, काणकोण आरोग्य केंद्रात ९, मडगाव आरोग्य केंद्रात ६७, वास्को आरोग्य केंद्रात ३७४, लोटली आरोग्य केंद्रात ८, मेरशी आरोग्य केंद्रात ८, केपे आरोग्य केंद्रात ११, सांगे आरोग्य केंद्रात १, शिरोडा आरोग्य केंद्रात १०, धारबांदोडा आरोग्य केंद्रात ४६, फोंडा आरोग्य केंद्रात ५७ आणि नावेली आरोग्य केंद्रात १९ रुग्ण सापडले आहेत. म्‍हाऊसवाडा पेडणे येथे बुधवारी ७ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सापडले आहेत. राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळले असल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT