पणजी: राज्यात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियन्टचा संभाव्य धोका कायम असतानाच गेल्या पाच दिवसांत राज्यात 256 रुग्णांची वाढ झाली असून संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) 1.3 वरून 3.6 पोहचला आहे. दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियन्टचे निदान करण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (NIA) पाठवलेले 20 हून अधिक नमुने अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा धोका कायम आहे, हे आता राज्य प्रशासनाच्या (Goa Government) लक्षात आल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी ही अतिसावधानतेची वेळ असल्याचे कबूल करीत त्यात दिशेने तयारी सुरू केली आहे.
Corona outbreak in Goa
राज्यात नाताळ (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) स्वागताची धूम सुरू असून बहुतांश हॉटेल ‘फुल्ल’ आहेत. समुद्र किनाऱ्यांवर फेसाळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक (Tourism) राज्यात दाखल झालेले आहेत. पणजीतील कॅसिनो (Casino) तुडुंब भरून वाहात आहेत.
सर्वांत गंभीर आणि महत्त्वाची बाब म्हणजे तिथे सर्वत्र कोरोनाच्या (Covid-19) नियमावलीचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य प्रशासन, आरोग्य विभाग आणि पर्यटन विभाग सोमवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन) जाहीर करणार आहे. यामध्ये रात्रीच्या संचारबंदीचा (नाईट कर्फ्यू) पर्याय असू शकतो. याशिवाय राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या पार्ट्यांवरही बंदी येऊ शकते किंवा राज्यात जमावबंदीचे 144 कलम लागू होऊ शकते.
एक बळी; 61 नवे रुग्ण : सध्या राज्यात ख्रिसमस (Christmas) आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांनी सर्व किनारे गजबजले असून कोविड नियमांचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या कोरोना रिकव्हरी रेट 97.79 टक्क्यांवर आहे. शनिवारी राज्यात एका बळीची नोंद झाली.
राज्यात वाढणारी रुग्णांची संख्या ही अतिसावधानतेची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी (Tourist) गर्दीची ठिकाणे टाळून मास्कचा वापर करावा आणि कोरोनासंबंधीच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.