Abdul Naik Korgao Panchayat Goa Dainik Gomantak
गोवा

Corgao Panchayat: 'मुस्‍लीम' असल्‍याने सरपंचपदाला विरोध; कोरगावच्या अब्‍दुल यांना द्यावे लागले देशभक्‍तीचे पुरावे!

Corgao Village Panchayat Pernem Goa: मला सरपंच होण्यासाठी पाठिंबा दिलेल्या माझ्या पंचायत सहकाऱ्यांवर दवाब आणणे योग्य नाही. अशाप्रकारे गावात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या प्रयत्नांना कुणीही बळी पडू नये, असे आवाहन अब्दुल नाईक यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Corgao Village Panchayat Pernem, Goa

पेडणे: ‘मुस्‍लीम असल्‍याने कोरगाव सरपंचपदी निवड झालेल्‍या अब्‍दुल करीम नाईक यांना पायउतार होण्‍यास भाग पाडा; अन्‍यथा पंचसदस्‍यांच्‍या घरावर मोर्चा काढू’, अशी भूमिका काल काही संघटनांनी घेतली. या पार्श्वभूमीवर आमचे घराणे हे देशप्रेमी असून, माझे आजोबा इस्माईल ऊर्फ गफूर नाईक हे स्वातंत्र्यसैनिक होते.

पोर्तुगिजांनी त्याना तुरुंगातही डांबून मारबडव केली. गोवा मुक्तीसाठी त्यांनी बरेच काम केले आहे, त्यासाठी तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते ‘ताम्रपट’ देऊनही त्यांचा सत्कार झालेला आहे, असा खुलासा करण्‍याची वेळ अब्‍दुल नाईक यांच्‍यावर आली.

सोमवारी अब्दुल यांनी पत्रकार परिषद घेऊन बाऱ्याच मुद्यांवर भाष्‍य केले. आमचे घराणे देशाशी एकनिष्ठ असल्याबाबत पुरातत्व खात्यातही पुरावे सापडतात. मी धर्माने मुस्लीम असल्याने आमच्या गावात व तालुक्यात आमच्या घराण्याचे व माझे हिंदू, ख्रिश्चन या सर्व धर्माच्या लोकांसोबत चांगले संबंध असून आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.

असे असताना मी मुसलमान असल्याचा ठपका ठेवून मला सरपंच होण्यासाठी पाठिंबा दिलेल्या माझ्या पंचायत सहकाऱ्यांवर दवाब आणणे योग्य नाही. अशाप्रकारे गावात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या प्रयत्नांना कुणीही बळी पडू नये, असे आवाहन अब्दुल नाईक यांनी केले.

या पत्रकार परिषदेला अनुराधा कोरगावकर, दिवाकर जाधव, नीता नर्से, कल्‍पिता कलशावकर हे उपस्थित होते. पुढे बोलताना सरपंच अब्दुल नाईक म्हणाले की, आम्ही या भागातील एक छोटेसे जमीनदार आहोत.

कोरगावमधील हिंदू देवस्थानातही आमच्या आजोबा- पणजोबांनी आपल्याच देवता या भावनेने भूमिका देवीला नथ अर्पण केली, श्री कमळेश्वर मंदिराच्या छपराचे काम केलेले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाला या देवस्थानात मानसन्मान आहे.

यापूर्वी माझे चुलत बंधू हसन नाईक यांनीही कोरगाव पंचायतीचे सरपंचपद भूषवलेले आहे तर गावातील हिंदू-ख्रिश्चन लोकांच्या सहकार्यामुळेच मी दोनवेळा पंचायत निवडणुकीत निवडून आलो.

अवहेलना करणाऱ्यांचा धिक्कार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटना ही निधर्मीय आहे. त्या सभेत माझी तुलना ‘कसाब’ या अतिरेक्याशी केली, याचे मला अतिशय दुःख होते. मी हातात बंदूक घेऊन फिरणारा अतिरेकी नाही. आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, असे सरपंच अब्दुल नाईक यांनी सांगितले.

दिवाळीच्या दिवशी तीन महिला पंचायत सदस्यांना एका मुस्लीम धर्माने पळविले, असे म्हणत आमची अवहेलना करणाऱ्या तसेच स्वत: हिंदुत्ववादी म्हणून मिरणाऱ्यांचा हाच काय हिंदुत्ववाद, हेच काय त्यांचे संस्कार, असा संतप्त सवाल पंचायत सदस्य नीता नर्से यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT