Corgao Lake Diwali Fort Dainik Gomantak
गोवा

Corgao Lake: हर हर महादेव! दिवाळीनिमित्य तळ्यात उभा केला भव्य किल्ला, शिवरायांचा 7 फूट पुतळा

Corgao Lake Fort Replica: कोरगाव येथील श्री कमळेश्वर देवस्थानाच्या तळ्यावर किल्ला बांधण्याचे ठरल्यानंतर त्यांनी चलचित्रकार अनिशकुमार पोके यांना ही कल्पना सांगितली.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रकाश तळवणेकर 

कोरगाव येथील तळ्यात एक मोठा किल्ला उभा राहिला आहे! या किल्ल्यातील महालात शिवाजी महाराजांचा सात फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा आरुढ आहे आणि हा किल्ला पहाण्यासाठी विद्यार्थी, लोकांची, पर्यटकांचीची गर्दी होत आहे. ज्यांच्या मनात हा किल्ला बांधण्याची कल्पना आली ते कोरगाव येथील जाज्वल्य शिवप्रेमी संतोष पालेकर व त्यांचे मित्र सचिन कोरगावकर हे या किल्ल्याला मिळणारी प्रशंसा पाहून खुश आहेत.

आजच्या काळात किल्ल्यांची संकल्पना कालबाह्य झालेली असली तरी या काळातील नवीन पिढीसमोर शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या कर्तृत्वाचा  आदर्श निर्माण व्हावा या हेतूने  राज्यात किल्ले बांधण्याचे आवाहन  शिवप्रेमीतर्फे करण्यात आले होते. त्यांनी किल्ल्यांची स्पर्धाही आयोजित केली होती.

त्यानुसार  संतोष पालेकर व सचिन कोरगावकर यांच्या मनात, किल्ला तर बांधूयाच पण तो खऱ्याखुऱ्या किल्ल्याप्रमाणे दिसेल असा असावा असे ठरले. त्यांच्या या कल्पनेला पुढे कोरगाव सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ, कोरगाव शिवजयंती समारोह सोहळा समिती व श्री कमळेश्वर देवस्थान यांचे सहकार्य लाभले.

कोरगाव येथील श्री कमळेश्वर देवस्थानाच्या तळ्यावर किल्ला  बांधण्याचे ठरल्यानंतर त्यांनी चलचित्रकार  अनिशकुमार पोके यांना ही कल्पना सांगितली. हे तळे मोठ्या क्षेत्रफळाचे तसेच सुमारे सात फूटपेक्षा खोल आहे. किल्ल्याचा आराखडा तयार झाला पण त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता होती. दुसरे एक शिवप्रेमी शाम  शेटये यांनी ती जबाबदारी स्वीकारली.

तळ्यात प्रथम लोखंडी सळ्या व पट्ट्या घालून पाया तयार करण्यात आला. त्यावर शिवाजी महाराजांचा महाल उभा केला गेला. तळ्याच्या रुंद कठड्यांचा वापर करून त्यावर किल्ल्याची भिंत, बुरुज बांधण्यात आली. दिवाळीच्या दिवसात पडणारा पाऊस व तळ्यातील पाणी याचा विचार करून पाण्यात टिकेल असा प्लायवूड या रचनेत वापरण्यात आला आहे.

त्याशिवाय किल्ल्याच्या भिंतींसाठी वापरलेल्या मांजरपाटावर वॉटरप्रूफ रंगांचा वापर करण्यात आला आहे. सुमारे वीस -पंचवीस  दिवसांच्या अथक  प्रयत्नानंतर तळ्यात हा किल्ला उभा राहिला आहे. रात्रीच्या वेळी, वीजेच्या रोषणाईत हा किल्ला अधिकच आकर्षक दिसतो.

या किल्ल्यावर चालतही जाण्याची सोय असली तरी किल्याच्या आतील भागात जाण्यासाठी एक होडीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. होडीतून किल्ल्यावर जाण्याचा आनंद  और आहे. हा किल्ला पहाण्यासाठी रोज होणारी गर्दी लक्षात घेऊन आणखीन महिनाभर  हा किल्ला लोकांना पहाण्यासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बांबू, लोखंड, वॉटरप्रूफ प्लायवूड/रंग आणि कपडा या साहित्याचा वापर हा किल्ला बांधण्यासाठी केला गेला आहे. या किल्ल्याची रचना (design) मी, अनिश पोके आणि संजीव कोरगावकर या तिघांनी मिळून केली आहे. ही रचना संपूर्णपणे काल्पनिक आहे. अशा अनेक रचनात्मक कामात आमचा सहभाग असला तरी किल्ल्याची रचना आम्ही पहिल्यांदाच केली आहे.

या किल्ल्यात स्थापना करण्यासाठी ७ फूट उंचीच्या पुतळ्याची मदत मला आमच्या एका दुसऱ्या मित्राकडून झाली आहे. हा पुतळा बराच जड आहे हे मी इथे सांगू इच्छितो. स्पर्धेच्या निमित्ताने हा किल्ला तयार झाला असला तरी स्पर्धा हे केवळ निमित्त मात्र होते. या किल्ल्यासाठी तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचा खर्च आम्ही केलेला आहे. या किल्ल्याला लोकांकडून जो प्रतिसाद लाभतो आहे तोच मुळात पारितोषिकासारखा आहे. 

- संतोष पालेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

SCROLL FOR NEXT