Cooking Oil  Dainik Gomantak
गोवा

रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम गोव्यात खाद्य तेलाच्या किमतींवर

पणजीत भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात बदल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गोव्याच्या बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांत खाद्य तेलाच्या किमतीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक कच्च्या उत्पादनांची आयात ठप्प झाली आहे. परिणामी पुढील काही दिवसांत तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची भीती आहे. (Goa News)

ब्रँडेड कंपनीचे पाम तेल, तसेच वनस्पती तुपासह इतर खाद्य तेलाच्या किमतीत अनपेक्षित वाढ झाली आहे. युद्धाचा परिणाम म्हणून साबणाच्या किमतीही वाढू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

मडगाव (Margao) येथील एका किरानामाल दुकानाच्या मालकाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत सर्व ब्रँडेड तेलाच्या किमती 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आम्हाला कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे की ही किमतींमध्ये स्थिरता राहणार नाही. येत्या काही दिवसात या किमती अजून वाढू शकतात. जोपर्यंत युक्रेनमधील (Ukraine) युद्ध थांबत नाही तोपर्यंत या किमतीतील वाढ थांबणार नाही.

पणजीत भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात बदल झाले आहेत. टोमॅटो, बटाटा, कांदा (Onion) आणि इतर भाज्यांच्या बाजारभावात किरकोळ चढ-उतार दिसून येत असले तरी हिरव्या मिरचीचे दर वाढले आहेत. 60 रुपये किलोवर स्थिर असलेल्या हिरव्या मिरचीचा दर आता घाऊक बाजारात 120 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात 160 रुपये किलो झाला आहे, अशी माहिती बाजारातील भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT