Rumdamol Davorlim Dainik Gomantak
गोवा

धर्मरक्षणासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार, दवर्लीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचा वाद तीव्र

Rumdamol Davorlim: उद्घाटनाला न बोलवल्याने भाई नायक यांचा अहंकार दुखावला गेला, त्यामुळे केवळ त्यांनाच याबाबत समस्या आहे, असे वळवईकर म्हणाले.

Pramod Yadav

मडगाव: रुमडामळ दवर्ली येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद तीव्र झाला आहे. धर्मरक्षणासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार असून, धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा शिवप्रेमी विनायक वळवईकर यांनी दिला आहे. मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप वळवईकरांनी केला.

मंदिराच्या परिसरात असलेल्या पुतळ्यामुळे मारुती मंदिराच्या परिक्रमेला अडथळा निर्माण होत असल्याचा दावा ही पूर्णपणे दिशाभूल असल्याचे विनायक वळवईकर म्हणाले. तसेच, पुतळा स्थलांतरांचा पर्याय अमान्य असल्याचे वळवईकरांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासंबधित कोणताही वाद नाहिए. उद्घाटनाला न बोलवल्याने भाई नायक यांचा अहंकार दुखावला गेला, त्यामुळे केवळ त्यांनाच याबाबत समस्या आहे, असे वळवईकर म्हणाले.

धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये. धर्मरक्षणासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार असल्याचा इशारा शिवप्रेमी विनायक वळवईकर यांनी यावेळी दिला.

ट्रस्टचे आमच्यासोबत फार उत्तम संबंध आहेत केवळ एका व्यक्तीला समस्या असल्याने वाद होत असल्याचे विनायक वळवईकर भाई नायक यांच्यावर टीका करताना म्हणाले.

संभाजी महाराजांचा पुतळा इतरत्र हलविण्याची मागणी मान्य नसल्याचे वळवईकरांनी सांगितले. त्याचवेळी जिल्हाधिकारी देतील तो निर्णय मान्य असल्याचे यावेळी वळवईकर म्हणाले.

दरम्यान, याबाबत तोडगा काढण्यासाठी ०८ ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर घेतलेल्या बैठकीत ठोस उपाय निघाला नाही. त्यामुळे याबाबत पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT