Nilesh Cabral Danik Gomantak
गोवा

रस्त्यांच्या सद्यस्थितीला कंत्राटदार जबाबदार : मंत्री काब्राल

''दोषींवर करणार कडक कारवाईचा दिला इशारा''

दैनिक गोमन्तक

सासष्टी: पुलांवरील रस्ते तसेच गोव्यातील इतर भागातील रस्त्यांबद्दलच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सध्‍या जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, त्याला सर्वस्वी कंत्राटदार जबाबदार आहेत. खराब झालेल्‍या रस्‍त्‍यांची दुरुस्ती करणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे. रस्त्यांच्या कामाबद्दल पाहणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिला. मडगावात एका कार्यक्रमाला ते पत्रकारांशी बोलत होते. (Contractor responsible for current condition of roads: Minister Cabral )

या वेळी बोलताना त्यांना ‘अटल सेतू’बाबत विचारले असता ते म्हणाले की, या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे (जीएसआयडीसी) हातात घेण्‍यात आली आहे. त्यामुळे त्यावर आपण काहीही बोलू शकत नाही. पण जुवारी पूल अजूनही भक्कम आहे. या पुलाला लहानसहान दुरुस्तीची गरज आहे. पण नवा पूल पूर्ण झाल्यावर व त्या पुलावरुन वाहतूक सुरू झाल्यावर या जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हातात घेतले जाईल. मध्यंतरी पाऊस पडल्याने रस्त्यांच्या डागडुजीच्या कामावर परिणाम झाला व रस्ते खराब झाले असा दावा करून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा शोध घेण्यासाठी ‘अॅप’ तयार केले जाईल, अशी माहिती काब्राल यांनी दिली.

मडगावची सिवरेज योजना ही वर्षाअखेर पुर्ण करणार

मडगावच्या मलनि:स्‍सारण पाईपलाईनबाबत विचारले असता मंत्री काब्राल म्हणाले की, मडगावची सिवरेज योजना डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केली जाईल. बांधकाम खात्याकडून परवानगी न घेता ज्यांनी सिवरेज पाईपलाईनसाठी रस्ता खोदलेला आहे, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. आपण स्वत: या कामावर लक्ष ठेवून आहे. जेथे सिवरेज पाईपलाईनची व्यवस्था आहे, तेथील लोकांना ही जोडणी घेणे सक्तीचे केले जाईल. जे कोण ही जोडणी घेणार नाहीत त्यांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सदर योजना मार्गी लावण्‍यासाठी स्थानिक आमदार व लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही काब्राल म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT