Morjim Khind Park Dainik Gomantak
गोवा

Morjim News: 31 ऑक्टोबरची डेडलाईन पण एक टक्काही काम नाही! मोरजीतील ‘खिंड गार्डन’ची व्यथा

Morjim Khind Park: मोरजी पंचायत क्षेत्रातील ‘खिंड गार्डन’ हे ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत उभारले होते. ३१ ऑक्टोबरपूर्वी या गार्डनची सर्व प्रकारची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim Khind Park Garden

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील ‘खिंड गार्डन’ हे ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत उभारले होते. ३१ ऑक्टोबरपूर्वी या गार्डनची सर्व प्रकारची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र कंत्राटदाराने सहा महिन्यांत एक टक्काही दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यामुळे या गार्डनची अवस्था भकास अशी बनली आहे.

दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपूर्वी हे गार्डन फलक लावून बंद करण्यात आले होते. त्यामुळे या गार्डनमध्ये लहान मुलांबरोबरच इतर नागरिकांनाही प्रवेश दिला जात नाही.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आमदार जीत आरोलकर, मोरजीचे सरपंच पवन मोर्जे यांंच्यासह या गार्डनची पाहणी केली होती.

३१ ऑक्टोबरपूर्वी या गार्डनची दुरुस्ती करण्यात येतील, असे खंवटे यांनी पाहणीनंतर सांगितले होते. परंतु सहा महिने हे गार्डन बंद ठेवूनही एक टक्काही काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.

८ कोटींचा खर्च

या ‘गार्डन’साठी ८ कोटींचा खर्च करण्यात आला होता. परंतु कंत्राटदाराचा कामाचा दर्जा पाहता हे काम किती निकृष्ट दर्जाचे करण्यात आले,त्याचा अनुभव येतो. केंद्राच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत निधीतून या गार्डनची निर्मिती केली होती.गार्डनमधील आणि रस्त्याच्या मधोमध असलेले दिवेही पेटत नाहीत. दिवाळीचा सण म्हटल्यानंतर दिव्यांचा सण साजरा केला जातो. परंतु दिवाळीच्या दिवशीही या गार्डनवर अंधार पसरल्याचे दृष्य होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे 'दाबोळीत' स्वागत

Goa Waste Management: व्यवस्थापनाचा 'कचरा'! राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

Vijay Sardessai: सरदेसाईंनी केली जुन्या फातोर्डा बाजाराची पाहणी; सोबतच सरकारवर सोडले टीकास्त्र

'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Banking Fraud: खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक; 1 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT