Rumdamol Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Panchayat: रुमडामळ येथील मदरशाला स्थानिकांचा विरोध कायम; पंच सदस्याच्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवात

आज झालेल्या ग्रामसभेतही हा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

दैनिक गोमन्तक

Rumdamol Panchayat Madrasah : रुमडामळ पंचायत परिसरात मदरशाचा मुद्दा काही केल्या मिटण्याचे नाव घेत नाही. बेकायदा मदरशामुळे त्रास होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी ग्रामसभेत मांडली होती. या पंचायत क्षेत्रात असलेली मदरसा बंद करावी अशी मागणी स्थानिक अजूनही करत आहेत. आज झालेल्या ग्रामसभेतही हा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

रुमडामळ पंचायतीने आज ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी पुन्हा एकदा मदरसा बंद करण्याची मागणी स्थानिकांनी ग्रामसभेत केली. गावात असलेली मदरसा बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे अशी भूमिका स्थानिकांनी ग्रामसभेत मांडली.

मदरसा बेकायदेशीर असून हे बंद न झाल्यास तिथे डुक्कर आणून टाकणार असे वक्तव्य पंच सदस्याने केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, या मदरशाला पुर्वीच्या पंचायत कौन्सिलने मान्यता दिली होती. यातून लोकांना लाभ होत असून मंत्र्यांनी सुद्धा इथे भेटी दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता याबाबत अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT