MLA Antone Vaz | Cortalim Dainik Gomantak
गोवा

Cortalim News: कुठ्ठाळीत दूषित सांडपाणी सोडले सार्वजनिक गटारात! ‘त्या’ अपार्टमेंटवर कडक कारवाईचे आमदार वाझ यांचे निर्देश

Cortalim: कुठ्ठाळी,चावडेर नावता येथील मेलिझा ग्रीन व्हॅली अपार्टमेंटमधील दूषित सांडपाणी सार्वजनिक गटारातून सोडल्याने येथे आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित झाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Cortalim Melissa Green Valley Villa sewage Water Issue

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी,चावडेर नावता येथील मेलिझा ग्रीन व्हॅली अपार्टमेंटमधील दूषित सांडपाणी सार्वजनिक गटारातून सोडल्याने येथे आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी कुठठाळी पंचायतीचे पंच ओलिंडा लोबो व मेल्बिनो वाझ यांच्यासह पाहणी केली व पंचायतीने दिलेली ‘आॅक्युपन्सी’ मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, या मेलिझा ग्रीन व्हॅली अपार्टमेंट मध्ये प्रत्येकी आठ फ्लॅटचा समावेश असलेल्या पाच इमारती आहेत. या अपार्टमेंटच्या बिल्डरने सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने हे सांडपाणी सार्वजनिक गटारातून वाहत होते. याबाबत स्थानिक पंचायतीने अनेकदा पाहणी केली होती, शिवाय येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती.

याच, दरम्यान येथील आणखी एक इमारत बांधण्यात आली असून यात पूर्ण काम न होताच तसेच कुणीही राहत नसतानाही भोगवटा दाखला दिला आहे. या प्रकारास आमदार आंतोन वाझ यांनी आक्षेप घेतला असून याबाबत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

SCROLL FOR NEXT