Construction of Canacona municipality started
Construction of Canacona municipality started Dainik Gomantak
गोवा

काणकोण पालिका भवनाचे बांधकाम सुरू

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी पालिका भवन प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा विद्यमान पालिका मंडळाला आहे. तळमजल्यावर वाहनतळ असणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय संकूल,परिषदगृह, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय या संकुलात असणार आहे. त्याशिवाय सार्वजनिक समारंभांसाठी सभागृह असेल.

हे भवन 2100 चौरस मीटर क्षेत्रात उभे राहणार असून त्यांच्यासाठी १० कोटी रूपयांच्या खर्चाची तरतूद आहे. या तीन मजली इमारतीत सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतील. या भवनासाठी ‘जीसुडा’ योजनेतून सरकारने ७ कोटींचा निधी दिला आहे.तर गोवा मुक्ती सुवर्ण महोत्सवी वर्षात सरकारने विकास कामांसाठी पालिकेला दोन कोटी रूपयांचा निधी दिला होता, त्याचा विनियोग पालिका भवनासाठी करण्यात येणार आहे.

प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. भवनाच्या पाया उभारणीसाठी चर खणण्यात आले आहेत, मात्र अवकाळी पावसामुळे कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. मात्र ते लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येईल ,असे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT