Goa Job Scam  Canva
गोवा

Goa Crime: गोव्यात फसवणुकींचे सत्र सुरूच! 55 लाख उकळले; फोंडा पोलिसांकडून दोघांना अटक

Goa Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी जुने गोवे येथील श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिला अटक केल्यानंतर आता फोंडा पोलिसांनी अशाच दोन प्रकरणांत दोघांना अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Duo Arrested in Connection with Job Scam At Goa

फोंडा: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी जुने गोवे येथील श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिला अटक केल्यानंतर आता फोंडा पोलिसांनी अशाच दोन प्रकरणांत दोघांना अटक केली आहे.

एका प्रकरणात ४० लाखांना ठकविलेल्या कुर्टी येथील प्रकाश मुकुंद राणे, याला तर दुसऱ्या प्रकरणात कुर्टी येथील सागर सुरेश नाईक याला १५ लाखांना फसविल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या दोघांनाही शनिवारी रात्री उशिरा अटक केली. विशेष म्हणजे, प्रकाश राणे हा निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आहे, तर सागर नाईक हा ‘आयआरबी’ कॉन्स्टेबल आहे. उषा आश्‍वेकर, संतोष गोवेकर, पूजा खोर्जुवेकर, सुषमा गावस यांच्या तक्रारीनुसार सिंधुनगर-कुर्टी, फोंडा येथील प्रकाश मुकुंद राणे याने २०२१ ते २०२२ या काळात सरकारी नोकरी देतो, असे सांगून तक्रारदारांकडून ४० लाख रुपये घेतले होते.

राजकीय नेत्यांकडे ऊठ-बस असल्याचे सांगून फसवणूक

फोंडा येथील ठकसेन प्रकाश राणे याने तक्रारदारांना अबकारी खात्यात निरीक्षक तसेच शिक्षण खात्यात क्लार्कची नोकरी देण्याचे मान्य करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. मात्र, निर्धारित वेळेत नोकरी देण्यात राणे अपयशी ठरला, शिवाय दिलेले पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ करू लागल्याने शेवटी फोंडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संशयित प्रकाश राणे याने आपली राजकीय नेत्यांकडे ऊठ-बस असल्याचे सांगून फोटो व इतर साहित्यातून संबंधितांना भुलविले आणि पैसे उकळले. मात्र, निर्धारित मुदतीत नोकरीही नाही आणि पैसेही नाहीत. फोंडा पोलिसांनी संशयित प्रकाश राणे याला अटक केली असून पुढील चौकशी पणजी पोलिस करीत आहेत.

पाच जणांचे ५५ लाख लुटले!

प्रकाश राणे याने चारजणांकडून ४० लाख रुपये घेतले, तर सागर नाईक याने एका महिलेकडून १५ लाख रुपये घेतले. त्यामुळे फसविले गेलेल्यांची संख्या पाच असून एकूण ५५ लाख रुपये दोघांनी वेगवेगळ्या प्रकरणांत लुटले आहेत.

सागर सेवेतून बेदखल...

सागर नाईक हा बोर्डे - डिचोली येथील आयआरबी कँपमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कामाला होता. मात्र, १७ जुलैपासून तो कामावर आलेला नाही. शिवाय आयआरबी कमांडंटने पाठविलेल्या नोटिशीलाही त्याने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आयआरबी कमांडंट एडविन कुलासो यांनी ७ ऑगस्टपासून त्याला सरकारी सेवेतून बेदखल केले असून त्याचे हजेरीपटावरून नाव काढून टाकले आहे.

फोंडा फसवणुकीचे केंद्रस्थान

राज्यात आतापर्यंत नोकरीच्या निमित्ताने झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील बहुतांश संशयित हे फोंडा तालुक्यातील आहेत. एकूण नऊपैकी सहा संशयित हे एकट्या फोंडा तालुक्यातील आहेत. नुकत्याच अटक केलेल्या प्रकाश राणे याने आपली राजकीय नेत्यांमध्ये ऊठ-बस असल्याचे सांगून एकाची ४० लाखांची फसवणूक केली आहे.

उसगाव येथील एका युवतीला शिक्षिकेची नोकरी देतो, असे सांगून कॉन्स्टेबल सागर नाईक याने १५ लाख रुपये घेतले. माशेलातील विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देतो, असे सागरने सांगितले आणि तिच्याकडून १५ लाख रुपये उकळले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी नाही आणि पैसेही नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्या युवतीने फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT