vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोमेकॉतील ओपीडी गोदामे मी स्वच्छ केली! आरोग्यमंत्री राणेंची कोपरखळी

Goa Medical College: राज्याबाहेरील डॉक्टर्सना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याचा विचार सुरू आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील सरकारी इस्पितळे, सामुदायिक व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने कामावर बराच ताण येत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी राज्याबाहेरील डॉक्टर्सना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याचा विचार सुरू आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, गोमेकॉतील ओपीडी गोदामे होती, मी ती स्वच्छ केली, अशी कोपरखळी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज प्रश्‍नोत्तर तासावेळी विधानसभेत दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. या केंद्राच्या क्षेत्रात सुमारे ४४ हजार लोकसंख्या आहे.

गेल्या काही वर्षांत केंद्राला भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यान येथे अधिक डॉक्टर्स व परिचारिकांची गरज आहे. १२ परिचारिका या केंद्रासाठी असून परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णांना आरोग्य सोयी देण्यात अडचणी येत असल्याचे आमदार शेट यांनी निदर्शनास आणून दिले.

डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर असलेला कर्मचारी वर्ग असून त्यात कमतरता नाही. या इस्पितळात गैरसोयी आढळलेल्या नाहीत. मात्र, मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही पूर्वीची आहे, असे राणे म्हणाले.

ऑपरेशन थिएटर बनले गोदाम

ज्या आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी का घेत नाही? डिचोली सामुदायिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची बरीच गर्दी असते. या केंद्रात शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर) आहे मात्र तो विनावापर पडून आहे. हा कक्ष गोदाम बनला आहे, असे डॉ. शेट्ये म्हणाले.

राज्यात ‘हब अँड स्कोप’ मॉडेल राबवणार

डिचोली केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना हाताळण्यास कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे त्याचा आढावा घेऊन अधिक कर्मचाऱ्यांची सोय करायला हवी. त्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाकडे या जागा भरण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकारचा ‘हब अँड स्कोप’ मॉडेल गोव्यातही लागू करण्याचा विचार अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT