Narendra Modi in Goa Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय जनतेची सातत्याने फसवणूक, भाजप हाच पर्याय : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

Narendra Modi in Goa: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले आहेत. कोविड-19 प्रोटोकॉल पाळण्यासाठी मोदींची (Narendra Modi) सभा आभासी महापसामधून पद्धतीने होत आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.

त्यांनी भाजप (Goa BJP) पक्षाने आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. ज्या योजना भाजप सरकारतर्फे गोव्यातील जनतेला मिळाल्या आहेत, त्यांची सविस्तर माहिती त्यांनी गोवेकरांपर्यंत पोहोचली. हे बोलत असतानाच त्यांनी दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यावर सणसणीत टोला लगावला आहे. ते म्हणाले की, दिगंबर कामत यांना मला सांगावेसे वाटते की भाजप सरकारने जो विकास केला हेच खरे 'अच्छे दिन'. नाहीतर तुमची सत्ता केंद्रांमध्ये 20 वर्ष असूनही तुम्ही राज्यासाठी काहीच केले नाही. तुम्ही फक्त घोटाळे आणि घोटाळेच केले आहेत, याच्यापलीकडे तुम्ही या राज्याला काहीच दिले नाही. (bjp is the only option said pramod sawant)

दिगंबर कामत यांना किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी मला हे सांगावे की त्यांच्या काळात समाज कल्याणासाठी कोणती योजना सुरू झाली, जी आज अजूनही सुरू आहे; आणि हे माझे त्यांना खुले आव्हान आहे. मनोहर पर्रीकर यांची आजही काणकोणपासून पेडण्यापर्यंतचे लोक आठवण काढतात. कारण त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक योजनेमुळे आजही जनतेच्या अकाउंट मध्ये शासकीय निधी पोहोचत आहे. आम्ही केंद्रातील सर्व योजना गोव्यातील जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा हे सरकार गोव्यात आणण्यासाठी गोवेकर सज्ज झाले आहेत. आणि म्हणूनच कॉंग्रेससोबतच, गोवा फॉरवर्ड पार्टी, टीएमसी आणि आप असे सगळेच पक्ष आता घाबरले आहेत.

जेव्हापासून मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, त्या दिवसापासून लहानातील लहान गोष्ट जनतेपर्यंत कशी पोहोचेल यासाठीच मी काम केले आहे. आणि आमचे आधीचे कामकाज पाहता मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की गोव्यात स्थिर सरकार फक्त भाजपनेच दिले आहे. पुढील पाच वर्ष सुद्धा समृद्धीकडे जाण्यासाठी भाजप हाच एकमेव मार्ग आहे.

दिगंबर कामत, विजय सरदेसाई आणि सुदिन ढवळीकर यांनी फक्त स्वार्थाचे राजकारण केले!

जनतेने आजपर्यंत काँग्रेसचे राजकारण पाहिले, मगोचे राजकारण पाहिले आणि भाजपचेही राजकारण पाहिले आहे; त्यामुळे मी हे सांगू शकतो, दिगंबर कामत असतील, विजय सरदेसाई असतील किंवा सुदिन ढवळीकर असतील, यांनी फक्त स्वार्थाचे राजकारण केले, त्याशिवाय दुसरे काही नाही. मी या तिघांना सुद्धा आव्हान करतो की, त्यांनी सांगावे ते सत्तेत असताना त्यांनी जनतेसाठी कोणत्या आणि काय काय योजना राबवल्या आहेत; कारण या सगळ्यांनी फक्त खोटेपणाचे राजकारण केले आहे. टीएमसी आणि मगोपने आता युती केली आहे. पण टीएमसी बद्दल बोलायचं तर त्यांनी बंगाल मधे लोकांवर इतका अत्याचार केला, की त्याच्या 140 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी अशा पक्षांना मत न देण्याची जनतेला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्यासाठी आगामी निवडणुकीत आम्हाला 22 हून अधिक जागांवर निवडून देत स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT