Congress Dainik Gomantak
गोवा

...म्हणून मयेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्‍यक्त केला

गेल्या आठवड्यापर्यंत काँग्रेस नेत्यांकडून मयेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना सकारात्मक आश्वासन मिळाले होते.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मयेची जागा युतीच्या गोवा फॉरवर्डला देण्‍यात आल्याने तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्‍यक्त केला जात असून तेथे बंडखोरी अटळ असल्याचे संकेत मिळाले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसला (Congress) अनुकूल वातावरण असताना मयेची जागा गोवा फॉरवर्डला सोडण्याच्या निर्णयाचा निषेध करीत सोमवारी मये गट काँग्रेस समितीच्या 34 सभासदांनी समिती आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गट काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसे जाहीर करतानाच युतीच्या उमेदवारासाठी काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. (Mayem Congress latest news)

गेल्या आठवड्यापर्यंत काँग्रेस नेत्यांकडून मयेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना सकारात्मक आश्वासन मिळाले होते. मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसने कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला, असे गट काँग्रेसचे अध्यक्ष राजेश गावकर आणि जिल्हा समितीचे दिलीप गावस यांनी सांगितले. निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला आम्ही काम करणार नाही, असेही त्‍यांनी ठासून सांगितले. मयेची जागा युतीला सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे म्हणजे, हा प्रकार फिक्सिंग असल्याचा आरोप करण्‍यात आला. पत्रकार परिषदेला विनोद धुरी, जान्हवी धुरी, राजेंद्र मोरजकर आणि ॲड. गौतम शिरोडकर उपस्थित होते.

...तर 2012ची पुनरावृत्ती अटळ

गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) संतोषकुमार सावंत यांनी 2017 साली मयेतून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवताना जवळपास साडेसात हजार मते मिळवली होती. मात्र नंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला होता. अशा बंडखोराला समर्थन देण्याची पाळी काँग्रेस पक्षावर येणे याच्यासारखे दुर्दैव नाही. 2012 साली मयेत काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना हा मतदारसंघ युतीच्या राष्ट्रवादीला सोडला होता. परिणामी उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती. आता या निवडणुकीतही त्‍याचीच पुनरावृत्ती होणार आहे, असे गावस म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT