Amit patkr dainik gomantak
गोवा

गोव्यात काँग्रेसची पुर्नबांधणी करणार - अमित पाटकर

पुढील चार वर्षे काँग्रेस प्रत्येक गोमंतकीयांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार

दैनिक गोमन्तक

गोव्यात काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी अनेक उपाय योजले जातील. तसेच जास्तीत जास्त युवकांच्या विकासावर भर दिला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडतरी येथे सांगितले ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन केले त्यावेळी बोलत होते. (Congress will be restructured in Goa - Amit Patkar )

ते पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्ष एका कुटुंबासाठी एकच उमेदवारी हे तत्त्व जपणार आहे. ज्या कुटुंबांना दोन उमेदवार पाहिजेत, तर त्यांनी येत्या पाच वर्षांत काँग्रेस पक्षाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटावे लागेल. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे कुठे चुकले याचा आढावा घेण्यासाठी जून महिन्यात दोन दिवसांच्या चैतन्य बैठकीचे व कार्यशाळेचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी घोषित केले.

पुढील चार वर्षे व दहा महिने काँग्रेस पक्ष प्रत्येक गोमंतकीयांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा व त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षाने गंभीरपणे पावले उचलली असून आपण स्वतः दिवसाचे १६ तास पक्षाच्या कार्याला वाहून घेतले आहे. कुडतरीच्या लोकांना सध्याच्या आमदाराबद्दल संभ्रम निर्माण झाला. आमदार खरोखरच अपक्ष की भाजपचा असे लोक विचारू लागले आहेत. कुडतरीचे लोक भाजपबरोबर कधीही जाणार नाहीत असा विश्वास अमित पाटकर यांनी या वेळी व्यक्त केला. यावेळी मोरेनो रिबेलो, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, एम. के. शेख, सावियो डिसिल्वा यांनीही आपले विचार व्यक्त केले.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची कमान प्रियंका गांधींवर

यंदा हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने नव्या आखणी करत आहे. यात राष्ट्रीय काँग्रेसने ही तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. ही निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने प्रियांका गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे. घेतलेल्या निर्णयानुसार काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय सचिव देण्याचा निर्णय घेतला आहे. या सचिवांपैकी एक तृतीयांश सचिव हे प्रियांका गांधी यांच्या टीमचे असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT