Goa Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : पर्यटनमंत्र्यांनी 'दिल्लीवाल्यां'ची नावे जाहीर करावी; गोवा काँग्रेसची मागणी

महसूल वसुलीसाठी पर्यटन हे सर्वोत्तम साधन : एल्विस गोम्स

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : समुद्रकिनाऱ्यावरील 30 टक्के शॅक स्थानिकांनी 'दिल्लीवाल्यांना' सबलॅट केल्याच्या पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या आरोपावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने शनिवारी या ’दिल्लीवाल्यां’चीं नावे सार्वजनिक करावी अशी मागणी केली. तसेच जर सरकारी मालमत्ता भाडेतत्त्वावर दिली असल्यास त्याचीही माहिती द्यावी असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी शनिवारी म्हापसा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विजय भिके, जनार्दन भंडारी, विकास प्रभू देसाई, सांताक्रुझचे गट अध्यक्ष जॉन नाझरेथ आणि कळंगुट गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा उपस्थित होते.

गोम्स म्हणाले की, सरकारने आधी किती ‘बिगर गोमंतकियांना’ सरकारी मालमत्ता दीर्घ भाडेतत्त्वावर दिल्या आहेत हे सांगावे. महसूल वसुलीसाठी पर्यटन हे सर्वोत्तम साधन आहे. मात्र, तिथे सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

गोव्यात 340 शॅक्स आहेत. मात्र खवंटे यांच्या नुसार 102 शॅक बाहेरील लोकांना सबलेट केले आहेत, असे असल्यास त्यांनी त्यांची नावे सांगावी. त्यांची नावे सार्वजनिक करा. ही प्रक्रिया पारदर्शक असायला पाहिजे. त्यात कार्यवाही करण्याचे अधिकार मंत्र्यांकडे आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा आणि सांगावे की हे 30 टक्के शॅक्स कोणी ताब्यात घेतले आहेत,” असे गोम्स म्हणाले.

गोम्स म्हणाले की, दिवंगत डॉ. विल्फ्रेड डिसूझा यांनी पर्यटन मंत्री असताना पर्यटन क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून पर्यटनाच्या वापरासाठी जमिनी संपादित केल्या होत्या. किनारपट्टी भागात पर्यटन खात्याच्या जमिनी आहेत. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की या जमिनी सरकारने कोणाला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात सरकारने त्यांची मालमत्ता लीजवर दिली आहे असे गोम्स म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT