Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Congress Slams Bjp: भाजपमुळेच व्यापारी संकटात! गोवा कॉंग्रेसचा आरोप

डिचोलीत संमेलनाच्या नावाखाली पक्षाचा प्रचार

दैनिक गोमन्तक

Congress Slams Bjp: गेल्या रविवारी डिचोलीत भरविलेले व्यापारी संमेलन हा भाजपच्या बनेलवृत्तीचा भाग आहे. हे संमेलन नव्हे, तर लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला प्रचार आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर व्यापारी आर्थिक संकटात अडकले, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव महेश म्हांबरे यांनी आज (मंगळवारी) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक, फिरोज बेग आणि नाझीर शेख उपस्थित होते.

यावेळी म्हांबरे म्हणाले की, भाजप हा सर्व पातळीवर अपयशी ठरलेला पक्ष आहे. निवडणुका जवळ आल्या की, या पक्षाला जनतेची आठवण येते. मात्र, ज्यावेळी एखादा घटक संकटात अडकतो, त्यावेळी मात्र भाजपला त्याचे काहीच पडलेले नसते. गोड स्वप्नवत ''कहाणी'' सांगण्यात आणि एखाद्या विषयावरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात भाजपचे नेते ''बनेल'' आहेत, असेही म्हांबरे म्हणाले.

तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी खाणबंदीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने आर्थिक संकटाचा अध्याय सुरू झाला. 2014 पासून आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीवेळी खाण व्यवसाय सुरू करणार, असे आश्वासनाचे गाजर दाखविण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही.

खाणबंदीमुळे व्यापारीवर्गासह लहानसहान घटक संकटात अडकले. या संकटातून सावरण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू असतानाच, 2016 साली भाजप सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सामान्य जनतेला बराच मन:स्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला तर मोठा फटका बसला.

व्यापाऱ्यांचे हित की...

2017 साली भाजप सरकारने जीएसटी लादून व्यापाऱ्यांचे कंबरडेच मोडून टाकले. 2012 सालापासून व्यापाऱ्यांना सावरण्यासाठी भाजप सरकारने कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. डिचोलीत व्यापारी संमेलन घडवून आणण्यामागे त्यांचे हित आहे की, भाजपचा स्वार्थ आहे याचा व्यापाऱ्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे महेश म्हांबरे म्हणाले.

सी.टी. रवींच्या केवळ बाता

भाजप ही जुमला पार्टी आहे. भाजपचे डिचोलीतील व्यापारी संमेलन हे संमेलन नसून भाजपची प्रचारसभा होती, अशी टीका मनोज नाईक यांनी केली. नीती, नेता आणि नियतीच्या बाता मारणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासह भाजपचा पराभव का झाला ते अगोदर स्पष्ट करावे, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT