Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election 2025: जि.पं. निवडणुकीसाठी काँग्रेसची 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सामाजिक समीकरण साधत 'वादग्रस्त' सांताक्रूझ जागेवर केला दावा

Congress Second Candidates List: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

Manish Jadhav

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 11 महत्त्वाच्या मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 'सांताक्रुझ' (St. Cruz) या युतीतील वादग्रस्त जागेवरही काँग्रेसने उमेदवार दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. या यादीत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही विभागांतील आरक्षित आणि सर्वसाधारण जागांचा समावेश असून पक्षाने सामाजिक समीकरणे आणि स्थानिक नेतृत्वाला महत्त्व देत ही नावे अंतिम यादी जाहीर केली.

उत्तर गोव्यातील उमेदवारांची यादी

उत्तर गोव्यातील (North Goa) चार मतदारसंघांसाठी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली. यातील सांताक्रुझ जागा युतीमध्ये निश्चित झाली नव्हती, तरीही काँग्रेसने येथे उमेदवार उतरवल्याने युतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

हळदोण (Aldona)- सर्वसाधारण- कुमारी मारिया मेनेझेस

पेन्हा दि फ्रँका (Penha-de-Franca)- सर्वसाधारण- एल्ड्रिच ब्रूस डिसोझा

सांताक्रुझ (St Cruz)- महिला- कुमारी शायनी ऑलिव्हेरा

होंडा (Honda)-ओबीसी (OBC)- कृष्णनाथ रामा ठाकूर

हळदोण आणि पेन्हा दि फ्रँका या सर्वसाधारण जागांवरुन काँग्रेस जोरदार लढत देण्याची तयारी करत आहे. होंडा ही ओबीसीसाठी आरक्षित असल्याने येथे स्थानिक ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.

दक्षिण गोव्यातील उमेदवारांची यादी

दक्षिण गोव्यात काँग्रेसने सात मतदारसंघांसाठी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. अनुसूचित जमाती (ST) आणि महिलांसाठी (Women) असलेल्या आरक्षित जागांवर पक्षाने योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.

कुर्टी (Curti)- अनुसूचित जमाती- रामदास तेम्येकर

गिरदोली (Guirdolim)- अनुसूचित जमाती- संजय अर्जुन वेळिप

शेल्डे (Xeldem)-सर्वसाधारण- रोझारियो मारियानो फर्नांडिस

बार्शे (Barcem)-महिला- रोशन रुपेश वेलीप

कोला (Cola)- महिला (ओबीसी)- सुमित्रा पागी

सांकवाळ (Sancoale)- सर्वसाधारण- वसंत नाईक

कुठ्ठाळी (Cortalim)- महिला- कुमारी सँड्रा रॉड्रिग्स

कुर्टी आणि गिरदोली या दोन्ही जागांवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने स्थानिक ST समुदायातील नेतृत्वाला प्रोत्साहन दिले आहे. बार्शे आणि कुठ्ठाळी या महिला आरक्षित जागांवर काँग्रेसने प्रभावी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. सांकवाळ आणि शेल्डे या सर्वसाधारण जागांवरही काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काँग्रेसने (Congress) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करुन निवडणुकीच्या मैदानात जोरदार एन्ट्री केली आहे. सांताक्रुझसारख्या वादग्रस्त जागेवर उमेदवार देऊन काँग्रेसने युतीतील पक्षांना एक स्पष्ट संदेश दिला आहे. याचा अर्थ काँग्रेस स्थानिक पातळीवर कोणतीही जागा सोडण्यास तयार नाही आणि प्रत्येक जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीचे हे उमेदवार आगामी काळात गोव्याच्या स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT