Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Rebel : काँग्रेस आमदारांचा गट विलीनीकरणासाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सभापती रमेश तवडकर दिल्लीत असल्याने काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया तवडकर गोव्यात परतल्यानंतरच होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Rebel : गोवा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे आठ आमदार विलीनीकरणासाठी सज्ज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान सभापती रमेश तवडकर दिल्लीत असल्याने काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया तवडकर गोव्यात परतल्यानंतरच होणार आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात आमदारांची चर्चा सुरु आहे. भाजप प्रवेशासाठी सज्ज असलेल्या काँग्रेस आमदारांच्या गटामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह अन्य 7 आमदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे. अद्याप या भाजपप्रवेशाबाबत कोणत्याही आमदाराकडून अधिकृतपणे दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र आज किंवा उद्या हे आठही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान वास्को बायणा येथील एका पत्रकार परिषदेत नजिर खान यांनी या फुटीसंदर्भात एक मोठं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केलं होतं. यावेळी येणाऱ्या दोन महिन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नजिर खान यांनी केला होता.

राज्य काँग्रेस पक्षाने गोव्यातील अल्पसंख्याकांचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीपुरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे कठीण असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती नजिर खान यांनी दिली होती. ते पुढे म्हणाले, गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT