congress protest in goa Dainik Gomantak
गोवा

Congress : महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

आंदोलन सुरूच ठेवण्याचा काँग्रेस नेत्यांचा इशारा

दैनिक गोमन्तक

Congress : देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात विविध ठिकाणी शुक्रवारी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले.

पणजी येथेही कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला. यावेळी काढलेल्या निषेध मोर्चाला रोखत पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्ष बिना नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सरकारने कितीही धरपकड केली, तरी केंद्र सरकारविरुद्ध जनआंदोलन सुरूच राहिल असा इशारा पाटकर यांनी दिला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नागरिक त्रस्त असून त्यामुळेच पक्ष कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, निषेध मोर्चा काँग्रेस हाउसकडून मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी आंदोलकांना अडवले. त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. काही काळाने त्यांना सोडून देण्यात आले.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक आणीबाणीची स्थिती आहे. पूर्वी भाजप कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तुंमध्ये किरकोळ वाढ झाली, तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. आता महागाईने उच्चांक गाठला आहे. आता गॅसचा भडका उडाला असताना मंत्री स्मृती इराणी गप्प का आहेत? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

SCROLL FOR NEXT