Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: राहुल गांधींवरील 'FIR'विरोधात गोवा काँग्रेस आक्रमक; आझाद मैदानासह मडगावात जोरदार निषेध, 'आवाज दडपता येणार नाही'चा इशारा

Rahul Gandhi FIR Protest Goa: उत्तर गोवा व म्हादई जिल्हा काँग्रेस समित्यांतर्फे पणजीतील आझाद मैदानावर, तर दक्षिण गोवा काँग्रेसतर्फे मडगावात निषेध करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: उत्तराखंडातील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे कथित जातीय ‘शुद्धीकरण’ केल्याच्या निषेधार्थ वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेला ‘एफआयआर’ तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी गोवा काँग्रेसने सोमवारी जोरदार आंदोलन केले.

उत्तर गोवा व म्हादई जिल्हा काँग्रेस समित्यांतर्फे पणजीतील आझाद मैदानावर, तर दक्षिण गोवा काँग्रेसतर्फे मडगावात निषेध करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, तुलियो डिसोझा, अमरनाथ पणजीकर, समील वळवईकर, राजन घाटे, शशांक नार्वेकर, अर्चित नाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

राहुल गांधींचा आवाज ‘एफआयआर’ने दडपता येणार नाही, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला. कथित शुद्धीकरण करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संविधानिक समानता, सामाजिक न्याय आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT