Amit Patkar About Transfer Of Chief Secretary Punit Kumar Goyal
पणजी: राज्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल (आयएएस) यांना गोव्यातून हटविताना दिल्लीत भाजपने त्यांना एकप्रकारे पदोन्नती देऊन त्यांच्या बेकायदा कृत्यावर पांघरून घातले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
समाज माध्यमातील ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पाटकर यांनी आपले मत व्यक्त करताना भाजपवर आसूड ओढले आहेत.
‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपच्या राजवटीत, भ्रष्टाचार हा शिष्टाचार असल्याचे स्पष्ट दिसते. शेतजमिनीच्या बेकायदेशीर रूपांतरणात गुंतलेल्या भाजप सरकारचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांच्यासारख्या कलंकित नोकरशहाला सरकारकडून फक्त संरक्षणच दिले जात नाही, तर त्यांना पदोन्नतीही दिली जाते. ही पदोन्नती त्यांच्या बेकायदेशीर कृत्यावर पांघरूण टाकण्याचाच प्रकार आहे का? असेही पाटकर यांनी नमूद केले आहे. त्याशिवाय पाटकर यांनी यापूर्वीच्या पोलिस महासंचालकांनी केलेल्या कृत्यावरही टीका केली आहे.
मुख्य सचिव गोयल यांनी हळदोणे येथील रूपांतरित केलेल्या जमीन बंगल्यासह केलेली खरेदी वादातीत ठरली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असल्याने व त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी मोर्चाही काढल्याने त्यांची बदली होणार हे निश्चित मानले जात होते. सांकवाळ येथील इमारत पाडल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस महासंचालकांचा हस्तक्षेप अंगलट आल्याने त्यांनाही गोव्यातून बदली करून घ्यावी लागली होती. हळदोण्याचे रूपांतरित भूखंड खरेदी प्रकरण अंगलट आल्याने गोयल यांनाही भाजपने दिल्लीला नेले आहे. त्यांची बदली करताना मात्र त्यांना राष्ट्रीय आदिवासी आयोगाचे सदस्य बनविले आहे आणि एकप्रकारे त्यांना पदोन्नती दिल्याचाच हा प्रकार आहे, असे दिसते. यावरूनच आता पाटकर यांनी ‘एक्स’वरून या बदलीवरून सरकारवर टीका केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.