भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या फातोर्डा कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांसमवेत भाजपचे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार दामू नाईक व  इतर.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या फातोर्डा कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांसमवेत भाजपचे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार दामू नाईक व  इतर. Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: फातोर्डा मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: फातोर्डा मतदारसंघात कॉंग्रेस (Congress) पक्षाला खिंडार पडले. फातोर्डा कॉंग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष पिएदाद नॉरॉन्हा यांच्यासह निमंत्रक व विधानसभेतील कॉंग्रेसचे माजी उमेदवार जॉसेफ डिसिल्वाने कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन जवळ जवळ 200 कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह माजी नगरसेवक श्रीमती लिब्रांमेंट बार्रेटो व वकील, समाजसेविका मिली आंद्राद यांनीही आज भाजपात प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपाचे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महामंत्री व माजी आमदार दामू नाईक, कामिलो बार्रेटो, सदानंद नाईक, बबिता नाईक, सुनिता पराडकर, माजी नगरसेवक सुनंदा बांदोडकर, दक्षिण गोवा भाजप समितीचे अध्यक्ष तुळशीदास नाईक व फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, सरचिटणीस वल्लभ रायकर हे मान्यवर उपस्थित होते.

या अनुसुचित जाती समाजातील नेत्यांनी भाजपात प्रवेश करुन फातोर्डात एका नव्या पर्वाला सुरुवात केल्याचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले. त्यांच्या प्रवेशाने फातोर्डात भाजपची बाजु बळकट झाली आहेच, त्याचबरोबर त्यांचा फायदा इतर मतदारसंघातही होईल असेही तानावडे म्हणाले. कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड हे राजकिय पक्ष केवळ स्वार्थासाठी राजकारण करीत असुन हे या समाजातील नेत्यांना व लोकांना समजले आहे. या नेत्यांनी पक्षावर जो विश्वास दाखविला आहे तो कधीच निर्फळ होऊ देणार नसल्याचे तानावडे म्हणाले. माजी आमदार दामू नाईक यांनी सांगितले की फातोर्डा मतदार संघात 30 हजार मतदार आहेत, त्यातील 25 टक्के मतदार अनुसुचित जाती समाजातील आहेत. पुर्वी आमच्याकडुन चुक झाली खरी पण आता या समाजातील लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या विकासास हातभार लावण्यासाठी पक्षातर्फे योग्य पावले उचलली जातील असेही नाईक यानी सांगितले.

गोवा फॉरवर्ड ही कॉंग्रेसची ब टीम असल्याचे नाईक यांनी सांगितले. म्हणुनच तर गोवा फॉरवर्ड कॉंग्रेस पक्षाकडे युती करण्यास आसुसलेला आहे. हे नेते समाजाच्या उत्कर्षासाठी भाजप पक्षाकडे आकर्षित झाल्याचे नाईक यांनी सांगितले. मागच्या विधानसभा व नंतरच्या नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस नेत्यांनी आम्हाला काडीचाही पाठिंबा दिला नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुट असते. त्याचसाठी आम्ही या पक्षात सामिल झाल्याचे पिएदाद नॉरॉन्हा यांनी सांगितले.या प्रसंगी जॉसेफ डिसिल्वा, वकील मिली आंद्राद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी आभार प्रदर्शन केले. मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप नाईक यांनी सुत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT