Manikrao Thakare, Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

VIDEO: 'युतीतील नेत्‍यांबाबत गांभीर्याने विधाने करणे आवश्‍‍यक'! सरदेसाईंबाबत युरींनी केलेल्‍या विधानांशी काँग्रेस सहमत नसल्याचे ठाकरेंकडून स्पष्ट

Goa Politics: आलेमाव यांनी युतीत सहभागी पक्षांच्‍या नेत्‍यांबाबत गांभीर्याने विधाने करणे आवश्‍‍यक असल्‍याचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी रविवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांच्‍याबाबत केलेल्‍या वक्तव्‍यांशी काँग्रेस सहमत नाही. आलेमाव यांचे ते वैयक्तिक मत आहे असे म्‍हणत, प्रदेश काँग्रेसचे जबाबदार नेते असलेल्‍या आलेमाव यांनी युतीत सहभागी पक्षांच्‍या नेत्‍यांबाबत गांभीर्याने विधाने करणे आवश्‍‍यक असल्‍याचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी रविवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

विधानसभेच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाच्‍या अखेरच्‍या दिवशी सभागृहात घडलेल्‍या नाट्यानंतर युरी आलेमाव यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्‍याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केलेली होती. आमदार सरदेसाई ‘सेटिंग’ करीत असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केलेला होता. यावरून फॉरवर्डचे पदाधिकारी युरी आलेमावविरोधात आक्रमक झालेले आहेत.

या वक्तव्‍यांवरून युरींनी विजय सरदेसाईंची माफी मागावी, अशी मागणी त्‍यांच्‍याकडून होत आहे. दुसरीकडे, युतीत असल्‍यामुळे फोंडा पोटनिवडणुकीत गोवा फॉरवर्डचा काँग्रेसला पाठिंबा राहिल. परंतु, युरींनी केलेल्‍या वक्तव्‍यांमुळे आपण फोंड्यात काँग्रेसच्‍या प्रचारासाठी कसे जायचे?

असा सवाल खुद्द सरदेसाई यांनी उपस्‍थित केला होता. यावर पत्रकारांनी ठाकरे यांना विचारले असता, विरोधी पक्षांत मतभेद असू नये. नेत्‍यांनी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले.

विजय निश्‍चित काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतील!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांच्‍यात जे काही घडले, त्‍याबाबत आपण युरी आणि सरदेसाई या दोघांशीही चर्चा केलेली आहे. विजय सरदेसाई यांच्‍यावर आमचा पूर्ण विश्‍‍वास असून, फोंडा पोटनिवडणुकीत ते निश्‍चित काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतील, असा ठाम विश्‍‍वासही माणिकराव ठाकरे यांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT