MP Captain Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa News: '...मग कॅसिनो पण बंद करा', हाऊजीवर बंदी घातल्याने काँग्रेस खासदार विरियातो आक्रमक

MP Captain Viriato Fernandes on Housie: कॅसिनो किंवा जुगारच्या व्यवसायात असणाऱ्या इतरांना दुसऱ्या कोणाला पैसा मिळावे असे वाटत नाही; विरियातो फर्नांडिस

Pramod Yadav

Housie ban Goa

पणजी: हाऊजीवर बंदी घातल्याप्रकरणी दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सरकारवर टीका केली आहे. विरियातो यांनी या निर्णयावरुन धक्का बसल्याचे नमूद करत राज्यात सुरु असणारे कॅसिनो देखील बंद करावेत, अशी मागणी केली.

लहानपणापासून आम्ही हाऊजी पाहत आलोय. जेव्हा फेस्त असतो किंवा फुटबॉल आणि क्रिकेट मॅच व्हायच्या त्यावेळी हाऊजी चालायची. आमच्यावेळी ते एक रुपयाला विकली जात होती. त्यातून ५० ते १०० रुपयांचे बक्षीस मिळायचे. पैसा कमविण्यासाठी हे घेतले जात होते का? तर नाही यातून सर्वजण एकत्र यायचे आणि तो खेळ खेळला जातो होता. हा प्रकार जर सामजिक धोका असेल तर कॅसिनो देखील बंद करावेत, असे खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.

कॅसिनोमुळे अनेकजण रस्त्यावर आले ते बंद करण्याऐवजी लहान हाऊजीला बंद करण्याचे कारण कळत नाही, असे विरियातो म्हणाले. कॅसिनो किंवा जुगारच्या व्यवसायात असणाऱ्या इतरांना दुसऱ्या कोणाला पैसा मिळावे असे वाटत नाही. काही ठिकाणी तर ऑनलाईन जुगार सुरु आहे. वास्कोत अशा गोष्टी सुरु असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. याठिकाणी का कारवाई होत नाही, असा सवाल विरियातो यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ८ एप्रिल रोजी तब्‍बल २८ लाख रुपयांची बक्षिसे असणारा ‘हाऊजी शो’ आयोजित करण्‍यात आला होता. याबाबत सर्वत्र जाहीरात देखील करण्यात आली होती. यासाठी आयोजकांनी मागितलेली परवानगी उपजिल्‍हाधिकारी कार्यालयाने नाकारली होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात धक्कादायक उमेदवारी

Omkar Elephant: सावधान! ‘ओंकार हत्ती’ गोव्याच्या सीमेवर; वन खाते पुन्हा सतर्क

Goa Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार! आरोपीचे ‘हवाला कनेक्शन’ उघड; बडे मासे सापडण्याची शक्यता

Goa Mining: खाण क्षेत्र सुधारणांसाठी गोव्याला 400 कोटी! मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार; राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ

SCROLL FOR NEXT