Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'विधानसभेला काँग्रेस आमदार फुटतील, भाजप-मगोपला 22 जागा मिळतील'! ढवळीकरांचे भाकित; कार्यकर्त्यांवर उधळली स्तुतीसुमने

Sudin Dhavalikar: २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगोपची युती असेल तर २२ च्यावर जागा जिंकून येतील, असा विश्वास मगोपचे सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगोपची युती असेल तर २२ च्यावर जागा जिंकून येतील, असा विश्वास मगोपचे सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा पंचायतीत भाजप-मगोप युतीच्या माध्यमातून तीन जागा मगोपला मिळाल्या होत्या आणि त्या तिन्ही जागांवर मगोपने विजय मिळविला. त्यानंतर प्रसार माध्यमांना बोलताना ढवळीकर म्हणाले, त्याशिवाय मगोपची सर्व मतदारसंघात हक्काची मते आहेत, त्यामुळे ही युती विधानसभेलाही राहिल्यास भाजप-मगोपची युती सत्तेत येईल, सरकार स्थापन करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.

भाजप आणि मगोपने एकत्रित बैठका घेतल्या, प्रचार केल्यास कार्यकर्ते बाहेर पडतात. त्यामुळे युतीच्या माध्यमातून जर प्रचार झाला तर विधानसभेला यश मिळणे अशक्य नाही, असे सांगत ढवळीकर म्हणाले, प्रचारासाठी बाहेर येणारे कार्यकर्ते हे केवळ पक्षासाठीच काम करतात.

ते पैसे घेऊन काम करीत नाहीत. भाजपचे असे पक्षासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. २०२७ मध्ये काँग्रेसला जरी सत्तेपर्यंत नेणाऱ्या जागा मिळाल्या तरी त्यांचे आमदार फुटतील, असेही त्यांनी भाकित व्यक्त केले. राज्यातील काँग्रेसला आई व बाप नाही, हे आपण पहिल्यापासूनच सांगत आलो आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT