Carlos Ferreira X
गोवा

सेक्स्टॉर्शन नव्हे रॅकेट! भाजप आक्रमक, काँग्रेस आमदार कार्लस फेरेरा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Goa Crime News: गोव्यात गेल्या आठवड्यात 'सेक्स्टॉर्शन'प्रकरणी ओडिशाच्या एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Pramod Yadav

म्हापसा: काँग्रेस आमदार कार्लस फेरेरा यांनी दिलेल्या 'सेक्स्टॉर्शन'च्या तक्रारीनंतर भाजपचे समर्थक आक्रमक झाले असून, हा प्रकार सेक्सरॅकेट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रविवारी (०८ डिसेंबर २०२४) नास्नोळा येथे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या नेतृत्वाखाली भाजप मंडळाने फेरेरा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे विद्यमान आमदार फेरेरा यांचा असून, त्यांनी हळदोणा गावाची नाच्चकी केली आहे, असा दावा करण्यात आला. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांकडून उपरोक्त प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

गोव्यात गेल्या आठवड्यात 'सेक्स्टॉर्शन'प्रकरणी ओडिशाच्या एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. विद्यमान आमदाराचा अश्लिल व्हिडिओ मोर्फ करुन सोशल मिडियावर व्हायरल केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. तक्रारीवरुन पोलिसांनी कुकेश राऊता (२५, रा. ओडिशा) याला अटक केली होती. संशयिताने या माध्यमातून आमदाराकडून पाच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती.

या घटनेमुळे आता भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले आहेत. आमदार फेरेरा यांच्या तक्रारीनंतर माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी याप्रकरणात फेरेरा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT