Korgao Pernem Road Dainik Gomantak
गोवा

Pernem: पेडण्यात खड्ड्यांमध्ये 'दिवाळी'! खराब रस्त्यांविरुद्ध आंदोलनाचा इशारा

Pernem News: पेडणे ते कोरगाव या मुख्य रस्त्याला सगळीकडे मोठमोठे खड्डे पडले आहेत. आठ दिवसांच्या आत या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पेडणे काँग्रेस गट समिती व समाजकार्यकर्त्यांनी दिवाळीच्या दिवशी रात्री पराष्टे येथे खड्ड्यांत मेणबत्त्या लावून सरकारला दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Korgao Pernem Bad Road

पेडणे: पेडणे ते कोरगाव या मुख्य रस्त्याला सगळीकडे मोठमोठे खड्डे पडले आहेत. आठ दिवसांच्या आत या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पेडणे काँग्रेस गट समिती व समाजकार्यकर्त्यांनी दिवाळीच्या दिवशी रात्री पराष्टे येथे खड्ड्यांत मेणबत्त्या लावून सरकारला दिला.

या मोहिमेत ॲड. जितेंद्र गावकर, कृष्णा नाईक, समाजकार्यकर्ते भास्कर नारुलकर, उदय महाले यांनी भाग घेतला. यावेळी ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले की, पेडणे ते कोरगावपर्यंत रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून त्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याची अशाप्रकारे दुर्दशा झाल्याने रोज या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होतच असतात. पेडणे तालुक्यात सरकारने एक असा रस्ता दाखवावा की, ज्या रस्त्याला खड्डे नाहीत. पराष्टेतील रस्त्याची पंधरा दिवसांत दुरुस्ती सुरू करावी. अन्यथा या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करू.

मालपेतील रस्ता कधी खुला होणार?

१. पेडणेतील मालपे येथे पावसात कोसळलेल्या दरडीमुळे नवीन केलेला रस्ता वाहतुकीस बंद होऊन आता जवळ-जवळ पाच महिने होत आले आहेत. मात्र, हे दरड हटविण्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे हा रस्ता कधी खुला होणार याबाबत लोकांकडून अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

२. तसेच यानंतर पर्यायी वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या मालपेतीलच जुन्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले. हा रस्ता दुचाकीचालक तसेच अवजड वाहतुकीसाठी अगदी जीवघेणा ठरला. आता दुरुस्ती सुरू असली तरीही चढणीवरील रस्ता धोकादायकच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT