Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसचे मुख्य सचिवांना पत्र

Goa Congress: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 15 दिवसांची मुदत

दैनिक गोमन्तक

Goa Congress

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल (आयएएस) यांना पत्र लिहून वाहतूक संचालक पोलुमतला पी. अभिषेक यांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्तीबद्दल तसेच राज्यातील रस्त्यांवरील जीवघेण्या अपघातांवर उपाययोजना करण्यात आलेल्या पूर्ण अपयशाबद्दल त्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

पाटकर यांनी राज्यातील ब्लॅक स्पॉट्स आणि अपघात प्रणव क्षेत्रे सुधारण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. काँग्रेस पक्षाने गोव्यातील वाहतुकीचे प्रभावी वाहतूक व्यवस्थापन करून नियमन करण्याची मागणीही सदर पत्रातून केली आहे.

याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने नुकतेच वाहतूक संचलनालयात जाऊन निदर्शने केली होती.

यावेळी राज्यात 48 तासांत पाच मृत्यू होऊनही वाहतूक संचालक रजेवर असल्याचे लोकांच्या समोर आले होते.

सध्याचे वाहतूक संचालक अत्यंत असंवेदनशील असल्याने निरपराधांना जीव गमवावा लागला आहे. या स्थितीत त्यांना वाहतूक संचालक पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे पाटकर यांनी पत्रात नमूद केले आहे. रेंट-ए-कॅब आणि रेंट-ए-बाईक विषयाकडेही पाटकर यांनी लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

SCROLL FOR NEXT