Rahul Gandhi, Amit Patkar. Manikrao Thakre Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोवा काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून कुरघोड्या! राहुल गांधी, खरगेंसमोर चर्चा; ठाकरे, पाटकरांच्या उपस्थितीत कारवाईचे संकेत

Congress Leadership in Goa: राज्यातील काँग्रेस पक्षातील काहीजण राज्य नेतृत्वाविषयी कुरघोड्या करीत आहेत, त्याची गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दखल घेतली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील काँग्रेस पक्षातील काहीजण राज्य नेतृत्वाविषयी कुरघोड्या करीत आहेत, त्याची गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दखल घेतली. आता हा विषय थेट राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी हा विषय गंभीरपणे घेतला असून, जे पक्षविरोधी कुरघोड्या करीत आहेत. नेत्यांची बदनामी करीत आहेत, असे कोण लोक आहेत, ते ओळखून त्यांच्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट संकेत प्रभारी ठाकरे, सचिव डॉ. अंजली निंबाळकर व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या उपस्थितीतील बैठकीत दिले गेले आहेत.

दिल्लीतील राज्यातील पक्षीय बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची उपस्थिती होती. या बैठकीस गोव्यातून उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सॅव्हियो डिसिल्वा हेही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी माणिकराव ठाकरे गोव्यात आले होते, तेव्हा त्यांच्यापर्यंत पक्षातील लोक पक्षविरोधी कुरघोड्या करीत आहेत,अशा तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. ठाकरे यांनी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्याच्या कार्यक्रमात पक्षात राहून कुरघोड्या करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे ठणकावले होते.

हाच विषय या नेत्यांनी खरगे आणि राहुल गांधींकडे मांडला आहे. त्यांनी ही बाब गंभीरपणे घेत पक्षविरोधी कारवाया करणारे ओळखावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावेत, असे स्पष्ट सूचना ठाकरे आणि पाटकर यांना दिल्या आहेत. त्यामुळे हे कुरघोड्या करणारे कोण आहेत, हे नेतृत्वाला शोधावे लागणार आहेत.

डॉ. निंबाळकर यांनीही या कार्यक्रमात ‘आप’ आणि ‘तृणमूल’ वर टीका केली होती. या अनुषंगाने व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी पक्षीय स्थिती वरिष्ठ नेत्यांकडे मांडण्यासाठी जिल्हाध्यक्षांसह वरील वरिष्ठ नेते दिल्लीत गेले होते. त्यावेळी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शनही घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT