Agnelo Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेसने उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा माजी आमदार आग्नेल यांचा आरोप

आमदार मायकल लोबो हे काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन काही दिवसांपूर्वी भाजपात परतले. त्यावेळी आग्नेल फर्नांडिस हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते, परंतु तेथील उमेदवारी लोबो यांना देण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी ही पैसे देऊन दिली होती. गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव या टोळीचे होते, निवडणुकीच्या काळातही उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप आम्ही केला होता. त्या आरोपावर आपण ठाम आहोत, असे मत माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

आमदार मायकल लोबो हे काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन काही दिवसांपूर्वी भाजपात परतले. त्यावेळी आग्नेल फर्नांडिस हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते, परंतु तेथील उमेदवारी लोबो यांना देण्यात आली.

आग्नेल यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी उमेदवारी देताना ड्र्ग्स माफिया, बिल्डर माफिया आणि खाण माफिया काँग्रेसमध्ये आल्याने पक्ष पूर्णतः संपला होता. जानेवारी 2021 मध्ये आपण मायकल लोबो काँग्रेसमध्ये येईल आणि निवडून आल्यानंतर पुन्हा ते भाजपात जाणार, असे स्पष्टपणे सांगितले होते.

काँग्रेस उभारी कशी घेणार?

जर 35 हजार कोटींचा घोटाळ असेल तर मायकल हे जाणारच हे स्पष्ट होते. मायकल यांना विरोधी पक्षनेते पद दिले म्हणून आपण दुखावल्याचे दिगंबर कामत सांगतात. जोपर्यंत या पक्षात गुंडू राव, गिरीश चोडणकर आहेत, तोपर्यंत पक्ष उभारी घेणार नाही. उमेदवारी देण्यासाठी आपण पैसे घेतले नाहीत, हे गिरीश यांनी देवळात जाऊन सांगावे, असे आपले त्यांना आव्हान आहे. कालही संकल्प आमोणकरांनी काँग्रेस नेत्यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला. कारण आमोणकर हे गिरीश यांचे पैसे आणणारा कलेक्टर होता, असेही आग्नेल यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT