Girish Chodankar | CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: अनेक मंदिरात बहुजन समाजाला गाभाऱ्यात प्रवेश नसतो; मुख्यमंत्र्यांनी यात बदल करावा...

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा सनातन धर्मावरून मुख्यमंत्र्यांना टोला

Akshay Nirmale

Girish Chodankar On CM Pramod Sawant: बहुजन समाजाला आजही राज्यातील मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून वंचित ठेवले जाते, अशी खंत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्यास परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

चोडणकर म्हणाले की, सनातन धर्मात बहुजन समाजाबाबत भेदभाव आहे. विविध जातींना सनातन धर्मात कमी लेखले जाते.

गोव्यात आपण पाहिले आहे की, ओबीसी, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतरांचा समावेश असलेल्या बहुजन समाजाला मंदिरात प्रवेशापासून वंचित ठेवले जात आहे. बहुजन समाजाशी भेदभाव केला जात आहे. त्यांना परत कसे देवळात आणता येईल, हे पाहिले पाहिजे.

काँग्रेस सर्व धर्मांचा आदर करते. आता डॉ. सावंत यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्यास बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश देण्याचे काम करावे, असे चोडणकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.

सनातन धर्माबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत चोडणकर म्हणाले की, सनातन धर्मात बदल घडवून आणण्याची गरज आहे.

गोव्यात धार्मिक द्वेष वाढवण्याचे काम भाजप सरकार आल्यानंतर सुरू झाले. भाजप आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी विद्वेष वाढवण्याचे काम केले. गोव्यातील धार्मिक सलोखा खराब होणे याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास राज्याचे मुख्यमंत्रीच कारणीभूत आहेत. त्यांनी सुरवातीला पोर्तुगीजांबाबतचे वक्तव्य केले. त्यानंतर आता देवळांबाबतचे वक्तव्य केले. राज्यातील धार्मिक, सामाजिक सलोख्याला नख लावण्याचे काम ते करत आहेत. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष जबाबदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT