Ferryboat Dainik Gomantak
गोवा

फेरी बोटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या गोम्स यांनी गोवा सरकारला घेरले

गोम्स यांनी दक्षता विभागाला नदी जलवाहतूक विभागाच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी बंदर कप्तान आणि काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी रविवारी फेरी बोटीच्या मुद्द्यावरून गोवा सरकारला घेरले. गोम्स यांनी आरोप केला आहे की, सरकारने पणजी फेरीबोट रॅम्प एका कसिनो कंपनीला वापरण्यास दिला आहे. याचबरोबर रॅम्पच्या बाजूला असलेल्या पाण्यात जेटी उभ्या करण्याची परवानगी देखील दिली आहे. याचा थेट परिणाम पणजी-बेती फेरीवर होण्याची शक्यता आहे.

गोम्स यांनी दक्षता विभागाला नदी जलवाहतूक विभागाच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. गोम्स यांनी अलीकडेच फेरी पॉईंटवरील सार्वजनिक शौचालय बंद करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारमधील एक मंत्री कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑफिसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाठिंब्याने नियमांना न जुमानता मनमानी करत आहे, असा आरोप गोंस यांनी केला आहे. सरकारच्या (Government) विशिष्ट निर्णयाची चौकशी करण्याची मागणी करत लवकरच याचिका दाखल करणार असल्याचेही गोम्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT