Captain Viriato  Dainik Gomantak
गोवा

Captain Variato: जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा नियम लागू करण्यापूर्वी जुन्या कॅसिनो बोटी स्क्रॅप करा

गोमंतक ऑनलाईन टीम

Captain Variato: काँग्रेस नेते कॅप्टन विरिएटो यांनी शुक्रवारी 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने स्क्रॅप करण्याच्या योजनेवरून सरकार आणि परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्यावर टीका केली. सरकारला जुन्या कॅसिनो बोटी रद्द करण्याचा सल्ला दिला.

राज्यातील दुचाकी मोटरसायकलवरून पायलट व्यवसाय करणाऱ्यांच्या दुचाकी जुन्या असू शकतात. टॅक्सीबाबत टॅक्सीचालक संवेदनशील आहेत. या वाहनांवर त्यांचे पोट भरते. सरकार याबाबत असंवेदनशील असू शकत नाही.

फर्नांडिस म्हणाले, प्रदुषणाबाबत सरकारला एवढी काळजी वाटत असेल, तर सरकारने आधी मांडवी नदीतील कॅसिनो बोटी भंगारात काढल्या पाहिजेत. ज्या 25 वर्षांपूर्वी इतर देशांत जात होत्या.

कॅसिनो चालकांनी जुन्या बोटी कॅसिनो बोटी म्हणून मिळवल्या आहेत. बोटींमध्ये प्रचंड शक्तिशाली इंजिन असतात ज्यामुळे प्रचंड प्रदूषण होते.

"जहाज वाहतूक महासंचालकांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी 25 वर्षांहून अधिक वयाची जहाजे स्क्रॅप करण्याचा किंवा त्यांना पुन्हा प्रमाणित करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. जर या बोटींना पुन्हा प्रमाणित करता येत असेल, तर सरकार रस्त्यावरील वाहनांना पुन्हा प्रमाणित का करू शकत नाही, असा सवालही फर्नांडिस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ekoshi News: '१५ दिवसांत झोन बदल मागे घ्या नाहीतर..'; मेगा प्रकल्पाविरुद्ध एकोशीवासीय संतप्त

Bank Robbery: खोटी ID बनवून बँकांची फसवणूक; दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील दोघांना अटक

Sanquelim Crime: साखळीतील ११ वर्षांच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलले; दोन दिवसांपूर्वी गोव्यात आलेल्या मुलाला का मारलं?

Bicholim Accident: अपघात कुणामुळे? डिचोली बसस्थानकापाशी वादावादीमुळे वाहतूक खोळंबली

Bambolim News: विक्रेत्यांचे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, वाहनांच्या रांगा; बांबोळीत वाहतूक समस्या ऐरणीवर

SCROLL FOR NEXT