Goa Politics : Congress Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रध्वजाचाही भाजपकडून व्यवसाय : काँग्रेसचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारने मागविलेले राष्ट्रध्वज खराब झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रीय अभिमानाप्रती भाजप सरकारचे अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तन या अनुषंगाने दिसून येते. आता राष्ट्रध्वजाचाही भाजपने व्यवसाय केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते कॅ. व्हिरिएतो फर्नांडिस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

(Congress leader Ca Virieto Fernandes alleged that the BJP has done business with the national flag as well)

राज्य सरकारला मिळालेल्या सुमारे अडीच लाख राष्ट्रध्वजांचे नुकसान झाल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कबुलीचा कॅ. फर्नांडिस यांनी समाचार घेतला आहे. या सरकारला खाद्यपदार्थ, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांची किंमत कळत नाही. राष्ट्रीय दिवसांचे उत्सव साजरे करून पैसे कमविण्याचे त्यांना वेड लागले आहे. या प्रकारातून त्यांनी स्वातंत्र्य दिनालाही सोडले नाही.

तिरंगा ध्वज खरेदीवर झालेल्या खर्चाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. बाजारभावाच्या तुलनेत झेंडे अत्यंत दुप्पट दराने खरेदी केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर होर्डिंग्जवर तिरंगा प्रदर्शित करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटवावीत, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट खर्चाचा तपशील द्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र प्रदर्शित करणाऱ्या भाजपच्या तथाकथित "हर घर तिरंगा" मोहिमेच्या प्रचारासाठी इव्हेंट मॅनेजमेंट आणि जाहिरात एजन्सीच्या नियुक्तीवर झालेला खर्च आम्हाला जाणून घ्यायचा आहे, असे फर्नांडिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT