Goa Politics Dainik Gomantak
गोवा

भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे; पी. चिदंबरम

भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असून 2022 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपला नक्की पराभूत करेल, असे गोवा काँग्रेसचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम म्हणाले.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: काँग्रेसचे गोवा निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम पणजीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, या काँग्रेसच्या (Congress) आवाहनाला गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) विजय सरदेसाई यांनी पुढे येऊन काँग्रेस पक्षाला पाठिंबा व्यक्त केला आहे. या पाठिंब्याला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संमती दर्शवली आहे. मात्र, या पुढील बाबी स्थानिक नेते ठरवतील.

भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असून 2022 च्या निवडणुकीमध्ये (Election) काँग्रेस भाजपला नक्की पराभूत करेल. पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसने त्यांचे नेतृत्व करावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे चिदंबरम यांनी समर्थन केले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आणि देशहितासाठी सर्वांनी एकत्रित येणे महत्त्वाचे आहे. यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असून टाळी दोन्ही हातांनी वाजवावी लागते, असा मार्मिक टोलाही चिदंबरम (P Chadambaram) यांनी हाणला.

पक्षांतर हा कलंक

गोव्यासाठी पक्षांतर हा कलंक असून राजकीयदृष्ट्या तो वेदनादायक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पक्षबदलूंना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही. लोकांनीही अशा दलबदलू लोकांना लक्षात ठेवून पराभूत करावे, असे आवाहन त्यांनी केला आहे. एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जाणे, हा जनतेने व्यक्त केलेल्या मताचा अनादर आणि विश्वासघात आहे, असेही चिदंबरम म्हणाले.

पक्षांतरबंदी कायदा सदोष

पक्षांतरबंदी कायदा हा पळवाटा असणारा, सदोष आणि त्रुटींनी भरलेला असून 2024 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यातील त्रुटी काढून नवा पक्षांतर बंदी कायदा केला जाईल, अशी माहिती चिदंबरम यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT