देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातच गोवा राज्याचाही समावेश आहे. पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारीला लागले आहेत. यातच मागील काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नव्याने गोव्यात दाखल झालेला तृणमुलने सुध्दा महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाबरोबर युती करत भाजप सरकार गोव्यातील जनतेला फसवत असल्याचे सांगत आहेत.
दुसरीकडे राज्यात मागील काही दिवसांपासून प्रमोद सावंत सरकारमधील घोटाळे पुढे येत आहेत. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रचारसभामधून राज्यातील नोकर भरत्यांमधील वाढते घोटाळे समोर आणत आहेत. यातच आता गोवा कॉंग्रेसने (Goa Congress) पत्रकार परिषद घेत राज्यातील नोकर भरतीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातील मंत्र्यांनी कशापध्दतीने पैसे घेऊन नोकऱ्या वाटल्या याचा खुलासा केला आहे.
'जे आमदार घरातील एका सदस्याला नोकरी देण्याचे वचन देतो म्हणून फसवतात. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षातील आमदार, मंत्री या आमदारांना ज्यापध्दतीने उत्तेजन देतात हे अशोभनीय आहे. नोकऱ्यामधील फेरफार, मेरीटमधील फेरफारसंबंधी आमच्याकडे पुरावे आहेत. सातत्याने नोकऱ्यामधील घोटाळे, वाढता भ्रष्टाचार, राज्यातील युवकांची नोकरी देण्याच्या मुद्दयावरुन होणारी फसवणूक हाच भारतीय जनता पक्षाचा विकास आहे का?' असा सवालही यावेळी कॉंग्रेस नेते आमोणकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ते पुढे म्हणाले, ''येणाऱ्या काळात राज्यात 30 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रमोद सावंत सरकारवर विश्वास ठेवू नका. नोकऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार आम्ही उघड करत आहोत. राज्यातील पोलिस भरतीमध्ये मोठ्याप्रमाणात घोटाळा झाला आहे. कॉन्स्टेबल पासून ते पीएसआयपासून च्या परिक्षेमध्ये सातत्याने घोटाळा पुढे आला आहे. होमकार्डची नोकरी देण्यासाठी 5 लाख रुपये मागितले जात आहेत. त्याचबरोबर इतर नोकऱ्यामध्ये 35-40 लाख रुपये घेऊन भारतीय जनता पक्षाचे सरकार नोकऱ्या वाटत आहे. अशापध्दतीने नोकऱ्या वाटल्या जात आहेत.''
''प्रमोद सावंत सरकारची मानसिकताच भ्रष्ट बनली आहे. हे सरकार मोठ्याप्रमाणात नागरिकांचे नुकसान करत आहेत. पैशाच्या भरवशावर नोकऱ्या वाटल्यामुळे जे युवक नोकरी मिळविण्यासाठी पात्र आहेत ते बाहेर पडले आहेत. आणि जे नोकरीसाठी पात्र नाहीत त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. राज्यातील 90 टक्के नोकऱ्या सत्तरीमध्ये कशापध्दतीने जातात हे नवल करणारे आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्या खात्यामधील नोकऱ्यांमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.