CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसने निकालाआधीच पराभव मान्य केलाय : मुख्यमंत्री

काँग्रेसने विनाकारण बिनबुडाचे आरोप करु नयेत, मुख्यमंत्री प्रमोद सावंताचा इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसने निवडणूक निकालाआधीच पराभव मान्य केला आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते भाजपवर फोन टॅपिंगचा आरोप करत आहेत, असं थेट प्रत्युत्तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसला दिलं आहे. काँग्रेसने पत्रकार परिषद घेत भाजपकडून काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप केला होता. तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. (CM Pramod Sawant News Updates)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपांनंतर आता आव्हान दिलं आहे. काँग्रेसला फोन टॅपिंग होत असल्याचा संशय असेल तर त्यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार करावी. विनाकारण बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा इशाराच मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिला आहे. तसंच पराभवाच्या भीतीने काँग्रेस वाट्टेल ते आरोप करत सुटल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान गुरुवारी काँग्रेसने (Congress) पणजीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत, गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कळंगुटमधील उमेदवार मायकल लोबो यांनीही या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला होता. भाजपने सर्वच पक्षांचा विश्वासघात केल्यामुळे कुणीही भाजपला (BJP) पाठिंबा देणार नाही. काँग्रेसच राज्यात सत्ता स्थापन करेल असा दावा यावेळी करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT