Moreno Rebello Dainik Gomantak
गोवा

मोरेन रिबेलो यांचा मोबाईल फोन जप्त

निवडणूक अधिकाऱ्यांरी रमेश एन. गावकर यांनी केली तक्रार

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुडतरी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी रमेश एन. गावकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर मायणा कुडतरी पोलिसांनी आज (मंगळवारी) तेथील कॉंग्रेस उमेदवार मोरेन रिबेलो यांचा सेल फोन जप्त केला आहे. मात्र, मोरेन यांनी आपण निरपराध आहे आपण समाज माध्यमावर कोणताच व्हिडिओ टाकलेला नाही तर आपले फेसबुक खाते अज्ञातांनी हॅक केल्याचे म्हटले आहे.

मायणा कुडतरीचे पोलिस (Police) निरिक्षक मोहन गावडे यांनी सांगितले की, निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासाचा भाग म्हणून मोरेन यांचा सेल फोन ताब्यात घेतला आहे. ते म्हणाले की, 9 फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ टाकला गेल्याची व त्यातून धार्मिक वैमनस्य निर्माण होऊन त्याचा मतदानावर (Goa Election) परिणाम झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणात लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 125 खाली व भा. दं. सं.च्या कलम 18 खाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मात्र, मोरेन यांनी या प्रकरणात आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट करताना कोणीतरी आपला फेसबुक अकांऊट हॅक करून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT