Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Congress:...तर दोन दिवसांत गोव्यात काँग्रेसचे सरकार; विरोधीपक्षनेते आलेमाव यांनी सांगितले गणित

Goa Congress:गोव्यात भाजप आणि काँग्रेसने त्यांचे त्यांचे गड राखण्याचे काम केले असून, दोघांनी दोन्ही जागेवरील विजयाचा व्यक्त केलेला विश्वास फोल ठरला आहे.

Pramod Yadav

Goa Congress

यावेळी देशात चारशे पारचा नारा देणाऱ्या एनडीए आघाडीच्या हाती निराशा आली आहे. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

केंद्रात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्याची तयारी करत असताना इंडिया आघाडी देखील सरकार स्थापनेसाठी चाचपणी करत आहे. अशात गोव्याचे विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्यात दोन दिवसांत काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकते, असे म्हटले आहे.

देशात भाजपप्रणित एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी येत्या आठ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. एनडीएच्या सरकार स्थापनेच्या तयारीत इंडिया आघाडी देखील सत्तेची गणितं तपासून पाहत आहे.

दरम्यान, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास गोव्यात दोन दिवसांत काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा दावा विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल याबाबत आम्हाला विश्वास आहे. आणि असे झाल्यास पुढील दोन दिवसांत काँग्रेस गोव्यात सरकार स्थापन करेल, असे आलेमाव म्हणाले.

जनतेने दिलेला कौल भाजपच्या तोंडावर जोरदार चपराक असल्याची टीका देखील आलेमाव यांनी यावेळी केली.

केंद्रातील सत्ता स्थापनेत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार सध्या निर्णायक असून, ते एनडीए सोबत असल्याने मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित आहे.

दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेसने त्यांचे त्यांचे गड राखण्याचे काम केले असून, दोघांनी दोन्ही जागेवरील विजयाचा व्यक्त केलेला विश्वास फोल ठरला आहे. भाजप दक्षिणेची लढत प्रतिष्ठेची केली होती, त्याठिकाणी धेंपे यांना विक्रमी मते मिळाली असली तरी विरियातो यांनी विजयश्री खेचून आणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT