MLM Scam: एमएलएम घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; महाराष्ट्र, गोव्यातून 38 कोटींची मालमत्ता जप्त

MLM Scam: समीर जोशी याच्यावर श्रीसूर्य इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
Enforcement Directorate
Enforcement Directorate Dainik Gomantak
Published on
Updated on

MLM Scam

श्रीसूर्य इन्व्हेस्टमेंट्सच्या मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या नागपूर विभागाने, गोवा आणि महाराष्ट्रात मोठी कारवाई करत 38 कोटींची मालमत्ता जप्त केलीय. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA), 2002 अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या नागपूर विभागाने महाराष्ट्र आणि गोव्यातील नागपूर, अमरावती, अकोला आणि मडगाव येथे कारवाई केली. ईडीने येथील 38.33 कोटी रुपये किमतीच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

श्रीसूर्य इन्व्हेस्टमेंट्स ही मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी समीर जोशी य़ा व्यक्तीशी संबधित आहे.

संलग्न मालमत्तेमध्ये समीर जोशी व त्याच्या कंपन्या आणि त्याच्या सहआरोपी साथीदारांनी विकत घेतलेल्या जंगम (Fixed Deposits) आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

Enforcement Directorate
Viral Post: 'तुमचा अहंकार आणि शर्म करो भाषण...', आता गोव्याला जा; स्मृती इराणींची नेटकऱ्यांकडून थट्टा

समीर जोशी याच्यावर श्रीसूर्य इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जोशीने साडे पाच हजार लोकांना दुपप्ट परतावा देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यामध्ये अधिकतर ज्येष्ठ लोकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

जोशी आणि त्याच्या पत्नीला या फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2013 मध्ये अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com