Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'उत्तर गोव्यात माझ्यासह 7 उमेदवार तयार, कामत-तवडकरांच्या नकारामुळे CM आणि BJP चे मानसिक संतुलन हाललंय' - भिके

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांना मतदारसंघातील कामाचे रिपोर्ट कार्ड सादर करण्याचे आव्हान दिले होते.

Pramod Yadav

Goa Politics Loksabha Election 2024

लोकसभा निवडणुकीचे देशात वारे वाहू लागल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दक्षिण गोव्यात मंगळवारी आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा गोंधळा उडाला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्यात इंडिया आघाडी विखुरली असल्याचे वक्तव्य केले. तसेच, उत्तर गोव्यात काँग्रेसचे कोणीच निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

"उत्तर गोव्यासाठी लोकांच्या मनातील उमेदवाराला तिकिट दिले जाईल, आणि तो कोण आहे याची आम्हाला कल्पना आहे. काही मर्यादांमुळे मी त्यांचे नाव घेऊ शकत नाही. विजयाची हमी नसल्याने काँग्रेसमधून कोणीच निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, त्यांना माहिती आहे की त्यांच्या उमेदवाराचा दीड लाख मतांनी निवडणुकीत पराभव होईल. उत्तर गोव्यातील लोकांनी नेहमीच भाजपला समर्थन दिले आहे," असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या विजय भिके यांनी कामत आणि तवडकरांच्या नकारामुळे CM आणि भाजपचे मानसिक संतुलन हालले आहे, अशा शब्दात टीका त्यांनी केली.

"गोवा लोकसभा जागेसाठी माझ्यासह इतर सातजण काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढण्यास तयार आहेत. दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी पराभवाच्या भीतीने निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर गोवा भाजप आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मानसिक संतुलन हरलले आहे असे दिसते," अशा शब्दात भिके यांनी टीका केली.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास कामत - तवडकरांच्या नकार देणे म्हणजेच डबल इंजिन भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड नापास असल्याचे मान्य करणे होय असा जबरदस्त टोला अमित पाटकर यांनी हाणला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांना मतदारसंघातील कामाचे रिपोर्ट कार्ड सादर करण्याचे आव्हान दिले होते. यावर माझे रिपोर्ट कार्ड दक्षिण गोव्यातील लोकांकडे आहे, अशी प्रतिक्रिया सार्दिन यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT